इजिप्तच्या पिरॅमिड खाली सापडला मोठा 'खजिना', वैज्ञानिकांसह जगभरातील लोक अवाक्!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 15:55 IST2025-03-24T15:54:45+5:302025-03-24T15:55:40+5:30

Egypt Giza pyramid : कधी कुणाच्या कबरी सापतात तर कधी खजिना. आता अजून अभ्यासकांच्या हाती एक मोठा 'खजिनाच' लागला आहे.

Egypt Giza pyramid underground city discovered by scientists | इजिप्तच्या पिरॅमिड खाली सापडला मोठा 'खजिना', वैज्ञानिकांसह जगभरातील लोक अवाक्!

इजिप्तच्या पिरॅमिड खाली सापडला मोठा 'खजिना', वैज्ञानिकांसह जगभरातील लोक अवाक्!

Underground City In Egypt Pyramid: इजिप्तमधील जगप्रसिद्ध पिरॅमिडमधील अनेक आश्चर्यकारक शोध नेहमीच समोर येत असतात. कधी कुणाच्या कबरी सापतात तर कधी खजिना. आता अजून अभ्यासकांच्या हाती एक मोठा 'खजिनाच' लागला आहे. २ अभ्यासकांनी इजिप्तच्या पिरॅमिडच्या खाली विशाल भूमिगत शहर असल्याचा दावा केला आहे. ज्याची त्यांनी पिरॅमिड खालची हाय रिझोल्यूशन इमेज तयार केली आहे.

'डेली मेल'च्या एका रिपोर्टनुसार, अभ्यासकांनी दावा केला आहे की, गीजा पिरॅमिडच्या खाली साधारण ६ हजार ५०० फुटापेक्षा जास्त खोलापर्यंत एक विशाल शहर पसरलं आहे. हे शहर पिरॅमिडच्या उंचीपेक्षा १० पट आणि मोठं असू शकतं.

या रिसर्चमध्ये रडार पल्सचा वापर करून पिरॅमिडच्या खाली हाय रिझोल्यूशन इमेज बनवण्यात आली आहे. या टेक्नीकसाठी कोणत्याही खोदकामाची गरज पडत नाही. काही अभ्यासकांनी या रिसर्चवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रोफेसर लॉरेन्स कोनियर्स यांचं मत आहे की, कोणतीही टेक्नॉलॉजी जमिनीच्या इतक्या खोलवर पोहोचणं शक्य नाही. अशात अंडरग्राउंड सिटी केवळ एक अतिशयोक्ती असू शकते.

प्रोफेसर लॉरेन्स कोनियर्स म्हणाले की, पिरॅमिडखाली शाफ्ट किंवा छोट्या रूमसारख्या संरचना असणं शक्य आहे. कारण प्राचीन लोकांसाठी हे ठिकाण फार खास होतं. प्राचीन मेसो अमेरिकेमध्ये लोक गुहांच्या प्रवेश द्वारावर पिरॅमिडचं निर्माण करत होते. 

इजिप्तच्या या गीजामध्ये ३ पिरॅमिड आहे. त्यांची नावे खफरे, खुफु आणि मेनकॉर आहेत. हे आजपासून जवळपास ४ हजार ५०० वर्षाआधी नाइल नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर बनवण्यात आले होते. 

Web Title: Egypt Giza pyramid underground city discovered by scientists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.