लक्झरी कार, दिवसाची ३-३ लाख रूपये कमाई...दुबईतील भिकाऱ्यांची श्रीमंती पाहून चक्रावेल डोकं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 12:31 IST2026-03-13T12:29:28+5:302026-03-13T12:31:16+5:30

Dubai Beggar Facts :खासकरून रमजानच्या महिन्यात अशा भिकारी गँग दुबई आणि शारजाहसारख्या शहरांमध्ये जास्त अॅक्टिव होतात. अचंबित करणारी बाब म्हणजे परदेशी व्हिसावर दुसऱ्या देशातून येऊन बरेच लोक या गँगसाठी काम करतात.

Dubai police arrested begging gangs in Ramadan, beggars use luxury cars, know how much they earn | लक्झरी कार, दिवसाची ३-३ लाख रूपये कमाई...दुबईतील भिकाऱ्यांची श्रीमंती पाहून चक्रावेल डोकं

लक्झरी कार, दिवसाची ३-३ लाख रूपये कमाई...दुबईतील भिकाऱ्यांची श्रीमंती पाहून चक्रावेल डोकं

Dubai Beggar Facts : देशातील काही कोट्यावधींची संपत्ती असलेल्या भिकाऱ्यांच्या बातम्या नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. भीक मागून त्यांनी किती घरे घेतली, बँकेत किती पैसे अशा गोष्टी नेहमी समोर येत असतात. आता दुबईतील पोलिसांनी अशा भिकाऱ्यांना पकडलंय, जे लक्झरी कारमधून भीक मागण्यासाठी येतात आणि केवळ काही तासांमध्ये ४० ते ५० हजार रूपये कमाई करून निघून जातात. पोलिसांनी एक अशी आश्चर्यकारक माहिती दिली की, भिकारी गँगमध्ये मेंबर्सची चक्क भरती केली जाते. खासकरून रमजानच्या महिन्यात अशा भिकारी गँग दुबई आणि शारजाहसारख्या शहरांमध्ये जास्त अॅक्टिव होतात. अचंबित करणारी बाब म्हणजे परदेशी व्हिसावर दुसऱ्या देशातून येऊन बरेच लोक या गँगसाठी काम करतात.

तीन लक्झरी कार असलेला भिकारी

खलिज टाइम्सच्या एका वृत्तानुसार, दुबई पोलिसांनी दोन दिवसांआधी एका भीक मागणाऱ्या १३ जणांच्या गँगला त्यांच्या म्होरक्यासह अटक केली आहे. पोलिसांनी इथे भीक मागणाऱ्यांना पकडण्याचं अभियानच सुरू केलंय. येथील पोलीस अधिकारी अली सलेम अल शम्सी सांगतात की, पोलिसांनी एका अशा भिकाऱ्याला पकडलंय, ज्याच्याकडे तीन लक्झरी कार आहेत. त्याने लोकांना मदत मागून मोठी रक्कम जमा केली होती. ही व्यक्ती शिफ्टमध्ये भीक मागण्याचं काम करत होती. आपली शिफ्ट संपल्यावर तो कपडे बदलून महागड्या लक्झरी गाडीने फिरायला जात होता.

१५ लाख रूपयांची कॅश  

पोलिसांनी याआधीही अशा काही भीक मागणाऱ्या लोकांनी अटक केली आहे. ज्यांच्याकडे मोठी रोख रक्कम सापडली होती. काही दिवसांआधीच दुबईच्या एका भीक मागणाऱ्या व्यक्तीकडे २० हजार दिरहम म्हणजे साधारण १५ लाख रूपये रोख रक्कम सापडली होती. जे त्याने केवळ दोन ते तीन दिवसात भीक मागून कमावले होते. 

एका दिवसात किती कमाई करतात? 

गेल्यावर्षीही अशाप्रकारे एका भीक मागणाऱ्याला अटक करण्यात आली होती, त्याने केवळ तीन दिवसांमध्ये १४ हजार दिरहम म्हणजे १० लाख रूपयांपेक्षा जास्त कमाई केली होती. त्याला एका मशिदीजवळ भीक मागताना अटक करण्यात आली होती. तो आर्थिक अडचणीचं कारण सांगत लोकांना पैसे मागत होता. नंतर समोर आलं की, तो देशात बेकायदेशीरपणे राहत होता.  

त्याचप्रमाणे दुबई पोलिसांनी गेल्यावर्षी रमजानच्या महिन्यात फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट करत रस्त्यावर भीक मागणाऱ्या व्यक्तीला दाखवलं होतं. लोक त्याला पैसे देण्यासाठी स्वत:हून त्याच्याकडे जात होते. पोलिसांनी सांगितलं की, या व्यक्तीने केवळ एका तासात ३६७ दिरहम म्हणजे २७ हजार रूपयांची कमाई केली होती.

Web Title : दुबई के भिखारी: आलीशान जीवनशैली, प्रतिदिन लाखों की कमाई, चौंकाने वाली संपत्ति

Web Summary : दुबई पुलिस ने भिखारी गिरोहों का पर्दाफाश किया, जो प्रतिदिन लाखों कमाते हैं, कुछ दिनों में ₹15 लाख तक। कुछ लोग शिफ्ट के बाद लग्जरी कारों का उपयोग करते हैं, संगठित भीख मांगने वाले नेटवर्क धार्मिक अवधियों का फायदा उठाते हैं।

Web Title : Dubai Beggars' Luxury Lifestyle: Earning Lakhs Daily, Shocking Wealth Revealed

Web Summary : Dubai police exposed beggar gangs earning huge sums, up to ₹15 lakhs in days. Some use luxury cars after shifts, revealing organized begging networks exploiting religious periods with foreign recruits.