Dubai nude shoot fame model family did not know that she was doing raunchy photoshoots | Dubai nude shoot : ट्रिपला जाते सांगून घरून बाहेर निघाली महिला वकील; अन् न्यूड फोटोशूट करताना पकडली गेली

Dubai nude shoot : ट्रिपला जाते सांगून घरून बाहेर निघाली महिला वकील; अन् न्यूड फोटोशूट करताना पकडली गेली

दुबईतील एका बाल्कनीमध्ये तीन डझनपेक्षा जास्त महिला न्यूड फोटोशुट करताना पकडल्या गेल्या आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून आता तुरुंगवास होण्याचा मोठा धोका आहे.  त्यापैकीच एका मॉडेलचं नाव ग्रेबोशचुक आहे. या २७ वर्षीय मॉडेलच्या कुटुंबियांना न्यूड मॉडेलच्या शूटबद्दल कळलं तेव्हा ही सगळेच चकीत झाले. याना युक्रेनची रहिवासी असून फोटोशूट करत असलेल्या ११ मॉडेल्समध्ये तिचा समावेश होता.  दुबई पोलिसांनी या तरूणीला अटक केली असून तिच्या कुटुंबियांना याबाबत काहीही कल्पना नव्हती. असा खुलासा करण्यात आला आहे. 

यानाच्या भावानं सांगितलं की, ''ट्रिपला जाते असं सांगून याना घराबाहेर पडली होती. अचानक माध्यमांमधून न्यूड फोटोशूटबद्दल कळलं आणि त्यात माझ्या बहिणीचं नाव आहे. हे कळल्यानंतर मी आश्चर्यचकीत झालो. सुरूवातील आम्हाला कळलंच नाही की नक्की काय झालंय.'' मेल ऑनलाईनच्या रिपोर्टनिसार याना एक ग्रेज्युएट मुलगी असून तिला आतापर्यंत तिच्या क्षेत्राची नोकरी मिळालेली नाही.  गेल्या एका वर्षापासून ती मॉडेलिंगचं काम करत आहे. हॉटेलमध्येही तिनं यापूर्वी काम केलं होतं. 

दणका! मास्क नाही म्हणून पोलिसांनी हातावर मारला 'असा' शिक्का, जेल मध्ये लिहायला लावला निबंध

दरम्यान दुबईतील एका पॉश परिसरात बाल्कनीमध्ये उभ्या या महिला एका प्रोफेशनल फोटोग्राफरला पोज देत आहेत. एका दुसऱ्या व्यक्तीने दुसऱ्या बाल्कनीतून या महिलांचे फोटो काढून व्हायरल केले. सौदी अरबमधील वृत्तपत्र द नॅशनलच्या रिपोर्टनुसार, हा एक पब्लिसिटी स्टंट असू शकतो.

नादच खुळा! या शेतकऱ्यांची कमाई ऐकून तुम्हीही आजचं सोडाल नोकरी; असं पिकवतात तरी काय? जाणून घ्या   

रिपोर्टनुसार, या महिलांना सहा महिन्यांची शिक्षा सुनावली जाऊ शकते आणि त्यांना एक हजार पाउंडचा दंडही भरावा लागू शकतो. सौदी अरबमध्ये कायदे फारच कठोर आहेत आणि या देशात पब्लिकमध्ये किस करणे किंवा विना लायसन्स दारू पिणे यासाठी शिक्षा होते. सौदी अरबच्या अनेक भागात शरीया कायदा चालतो आणि या देशात पॉर्नवरही दंड भरावा लागू शकतो किंवा तुरूंगावासाची शिक्षाही होऊ शकते.

Web Title: Dubai nude shoot fame model family did not know that she was doing raunchy photoshoots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.