पुराने दुबईत कसा केला हैदोस, NASA ने शेअर केले आधीचे आणि नंतरचे फोटो...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 14:56 IST2024-04-24T14:54:34+5:302024-04-24T14:56:53+5:30
आता अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने पूराच्या आधीचे आणि पूराच्या नंतरचे सॅटेलाइट फोटो जारी केले आहेत. यात दुबईत झालेल्या पावसाचं चित्र दिसत आहे.

पुराने दुबईत कसा केला हैदोस, NASA ने शेअर केले आधीचे आणि नंतरचे फोटो...
गेल्या आठवड्यात संयुक्त अरब अमीरातमध्ये झालेल्या बेतुफान पावसामुळे आणि आलेल्या पुरामुळे सगळं काही ठप्प झालं होतं. या पावसामुळे दुबई शहरामुळे सगळीकडे पाणी भरलं गेलं होतं. आता अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने पूराच्या आधीचे आणि पूराच्या नंतरचे सॅटेलाइट फोटो जारी केले आहेत. यात दुबईत झालेल्या पावसाचं चित्र दिसत आहे.
इथे केवळ एका दिवसात दीड वर्षात पडणारा पाऊस झाला. ज्यामुळे शहर ठप्प पडतं. सगळीकडे पूरस्थिती झाली. ज्यामुळे अनेक भाग पाण्याखाली गेले.
19 एप्रिलला नासाने लॅंडसॅट 9 सॅटेलाइट द्वारे काढलेल्या फोटोव्दारे पुरामुळे तयार झोलेले मोठमोठे तलाव दाखवत आहे. सॅटेलाइट फोटोमध्ये खोलवर निळ्या रंगाचे पाणीसाठे दिसत आहेत.
फोटोंपैकी एक दुबईच्या 35 किलोमीटर दक्षिण-पश्चिममधील एक शहर जाबेल अलीमधीलही पूर दिसत आहे. अंतराळातून घेण्यात आलेल्या एका दुसऱ्या फोटोत संयुक्त अरब अमीरातची राजधानी अबूधाबीमधीलही पुराची स्थिती दाखवण्यात आली आहे. येथील स्थितीही वाईट झाली आहे.
हिंदुस्थान टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार, इंरेरिअल कॉलेज लंडनच्या ग्रांथम इन्स्टिट्यूटने या पावसाला क्यायमेट चेंजसोबत जोडलं. अभ्यासक फ्रेडरिके ओटो म्हणाले की, जेव्हाही आपण खूप पावसाबाबत बोलतो तेव्हा आपण क्यायमेट चेंजबाबतही बोललं पाहिजे. क्लाउट सीडिंगवर लक्ष केंद्रित करणं मिसलीड होतं.
ते म्हणाले की, क्लाउल सीडिंग कोणत्याही गोष्टीमध्ये ढग बनवू शकत नाहीत जे पाऊस पाडतील. सगळ्यात आधी तुम्हाला ओलावा हवा असतो. त्याशिवाय ढग बनू शकत नाही. भलेही क्लाउड सीडिंगने दुबईच्या चारही बाजूने पाणी भरण्यास प्रोत्साहित केलं असोत, पण मॅन मेड क्लायमेट चेंजमुळे वायुमंडळात ढग तयार होण्यासाठी जास्त पाणी असण्याची शक्यता आहे. ओटो यांनी इशारा दिला की, जर लोक तेल, गॅस आणि कोळसा जाळणं सुरू ठेवतील तेव्हा क्लायमेट गरम होत राहणार. मुसळधार पाऊस होत राहणार आणि लोक पुरात आपला जीव गमावत राहणार.