दुबई, यूएईत ज्या लॉटरी काढून रातोरात कोट्याधीश बनतात लोक, ती लॉटरी तिकीट किती रूपयांना मिळते?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 10:39 IST2025-12-27T10:30:24+5:302025-12-27T10:39:58+5:30
Dubai Lottery Price : अनेक भारतीय मजुरांना किंवा सामान्य नोकरी करणाऱ्या लोकांनाही तिकडे लॉटरी लागल्याच्या अनेक घटना नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. या बातम्या वाचून लोकांच्या मनात नेहमीच प्रश्न येतात की, ही लॉटरी कोणती आहे?

दुबई, यूएईत ज्या लॉटरी काढून रातोरात कोट्याधीश बनतात लोक, ती लॉटरी तिकीट किती रूपयांना मिळते?
Dubai Lottery Price : आपण नेहमीच ऐकत किंवा वाचत असतो की, दुबई किंवा सौदी अमुक अमुक व्यक्तीला इतक्या कोटी रूपयांची लॉटरी लागली आणि ते रातोरात श्रीमंत झालेत. अनेक भारतीय मजुरांना किंवा सामान्य नोकरी करणाऱ्या लोकांनाही तिकडे लॉटरी लागल्याच्या अनेक घटना नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. या बातम्या वाचून लोकांच्या मनात नेहमीच प्रश्न येतात की, ही लॉटरी कोणती आहे? किती रूपयांनी मिळते वगैरे वगैरे....तर आज आपण हीच लोकांची लॉटरीबाबतची उत्सुकता दूर करणार आहोत.
यूएईमध्ये लॉटरीचं नाव निघताच, दोन प्रकारच्या लॉटरींचा उल्लेख सगळ्यात आधी होतो. एक म्हणजे दुबई ड्युटी फ्री मिलेनियम मिलिएनेअर आणि बिग तिकट अबू-धाबी. एका रिपोर्टनुसार, अलिकडच्या काळात या दोन लॉटरींच्या माध्यमातून भारतीय लोकांनी भरपूर कमाई केली आहे.
किती आहे लॉटरीची किंमत?
दुबई ड्युटी फ्री मिलेनियम मिलिएनेअर ही लॉटरी तेथील भारतीय लोकांमध्ये बरीच फेमस मानली जाते. कारण प्रत्येक सीरीजमध्ये केवळ ५ हजार लॉटरी रिलीज होतात. एका तिकीटाची किंमत १ हजार दिरहम म्हणजे २४ हजार ५०० रूपये इतकी असते. जेव्हा ही लॉटरी कुणी जिंकतं तेव्हा त्या व्यक्तीला १ हजार अमेरिकन डॉलर दिले जातात, म्हणजे साधारण ८.५ कोटी रूपये मिळतात. हे तिकीट दुबई इंटरनॅशनल एअरपोर्ट किंवा अधिकृत वेबसाइटवरून खरेदी केली जाऊ शकते.
बिग तिकटची किंमत किती?
अलिकडच्या काळात बिग तिकट अबू-धाबीची चांगली लोकप्रियता वाढली आहे. हे तिकीट ५०० दिरहम म्हणजेच १२ हजार २०० रूपयांना मिळतं. तर जॅकपॉट अनेकदा २५ ते ३० मिलिअन दिरहमवर पोहोचतो. अनेकदा एक विकत घ्या दुसरं तिकीट फ्री मिळवा किंवा दोन घ्या एक फ्री मिळवा अशा ऑफरही असतात. त्यामुळे भारतीय लोक ग्रुपने तिकीट घेण्याच्या प्रयत्नात असतात.
खलीज टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार, डिसेंबर २०२५ मध्ये कतारमध्ये काम असलेल्या १० लोकांच्या एका भारतीय ग्रुपने दुबई ड्यूटी फ्री लकी ड्रॉमधून १ मिनिअन डॉलर जिंकले. तिकीट एका सदस्याच्या नावावर होतं, पण पैसे सगळ्यांमध्ये सारखे वाटण्यात आले. याच महिन्यात सौदी अरबमध्ये काम असलेल्या राजन पी.वी. ने बिग तिकटमध्ये २५ मिलिअ दिरहम म्हणजेच ६० कोटी रूपयांचा जॅकपॉट जिंकला. ही व्यक्ती गेल्या १५ वर्षापासून लागोपाठ तिकीट खरेदी करत होती.