सकाळी ऐकलेलं एखादं गाणं दिवसभर पुन्हा पुन्हा का आठवत राहतं? पाहा काय असतं यामागचं नेमकं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 12:38 IST2026-02-10T12:33:31+5:302026-02-10T12:38:08+5:30

Interesting Facts : ईअरवर्म हा काही एखादा कीटक किंवा जीव नाही. ही मेंदूची एक खास स्थिती आहे. याला ब्रेन इच म्हणजे मेंदूची खाज असंही म्हटलं जातं.

Does your mind also keep humming the same song know the scientific reason | सकाळी ऐकलेलं एखादं गाणं दिवसभर पुन्हा पुन्हा का आठवत राहतं? पाहा काय असतं यामागचं नेमकं कारण

सकाळी ऐकलेलं एखादं गाणं दिवसभर पुन्हा पुन्हा का आठवत राहतं? पाहा काय असतं यामागचं नेमकं कारण

Interesting Facts :  आपण अनेकदा अनुभवलं असेल की, सकाळी जर एखादं गाणं ऐकलं किंवा कानावर पडलं तर दिवसभर तेच गाणं गुणगुणत राहतो. ऑफिसमध्ये कामात असो वा घरी जात असताना तेच एक गाणं डोक्यात फिरत राहतं. असं वाटायला लागतं की, मेंदूच ते गाणं पुन्हा पुन्हा म्हणत आहे. असं का होतं? याला काय म्हणतात? हेच आपण समजून घेणार आहोत. असं होण्याला वैज्ञानिक ईअरवर्म म्हणतात. म्हणजे असं संगीत जे मेंदूमध्ये फिक्स होतं आणि पुन्हा पुन्हा आपण ते गुणगुणतो.

काय आहे ईअरवर्म?

ईअरवर्म हा काही एखादा कीटक किंवा जीव नाही. ही मेंदूची एक खास स्थिती आहे. याला ब्रेन इच म्हणजे मेंदूची खाज असंही म्हटलं जातं. जेव्हा एखादं संगीत खूप प्रभावी असतं किंवा चांगलं असतं. तर ते आपल्या मेंदूत अडकतं आणि मेंदू आपल्याला पुन्हा पुन्हा त्याचाच विचार करण्यास भाग पाडतो.

ऑडिटरी कॉर्टेक्स काय करतो?

आपल्या मेंदूचा एक भाग ऑडिटरी कॉर्टेक्स असतो, ज्याला आवाज आणि संगीत समजतं. संशोधनात आढळून आलंय की, जेव्हा एखाद्याला एखाद्या ओळखीच्या गाण्याचा छोटा भाग ऐकवला जातो, तेव्हा मेंदू स्वत:च पुढील गाणं किंवा संगीत पूर्ण करू लागतं. म्हणजे गाणं संपल्यानंतरही मेंदू ते गाणं आतल्या आत गुणगुणत राहतो.

वैज्ञानिकांनुसार, हे काही प्रमाणात दाबण्यात आलेल्या विचारांसारखं आहे. एखादं गाणं विसरण्याचा आपण जेवढा जास्त प्रयत्न करतो, ते तेवढं जास्त लक्षात येत राहतं. काही एक्सपर्ट मानतात की, जेव्हा मेंदू रिकामा असतो, तेव्हा तो स्वत:ला बिझी ठेवण्यासाठी गाणं रिपीट करत राहतो. यूनिव्हर्सिटी ऑफ सिनसिनाटीचे प्रोफेसर जेम्स केलारिस यांचा रिसर्च सांगतो की, साधारण ९९ टक्के लोक आपल्या जीवनात कधी ना कधी ईअरवर्मचा अनुभव घेतात. म्हणजे ही काही एखादी समस्या नाही. तर प्रत्येक व्यक्तीसोबत होणारी मेंदूची एक प्रक्रिया आहे.

ब्रेन इचपासून सुटका कशी मिळवाल?

ईअरवर्मपासून सुटका मिळवण्याची अशी काही खास पद्धत नाही. काही गाणी थोड्या वेळाने विसरली जातात, तर काही काही गाणी अनेक दिवस मेंदूत अडकून राहतात. जर एखादं गाणं पुन्हा पुन्हा लक्षात येत असेल, तर एखादं दुसरं गाणं ऐकू शकता. असं केल्याने मेंदूची ही प्रक्रिया हळूहळू शांत होईल आणि जुनं गाणं आपोआप मेंदूतून गायब होईल.

Web Title : पूरे दिन दिमाग में गाना क्यों बजता रहता है: समझें।

Web Summary : बार-बार बजने वाला गाना? यह एक 'ईयरवर्म' है, एक ऐसी दिमागी स्थिति जहाँ आकर्षक संगीत अटक जाता है। श्रवण प्रांत परिचित धुनों को फिर से बजाता है। विशेषज्ञ चक्र को तोड़ने के लिए कोई दूसरा गाना सुनने का सुझाव देते हैं।

Web Title : Why a song replays in your head all day: Explained.

Web Summary : That repeating song? It's an 'earworm,' a brain state where catchy music gets stuck. The auditory cortex replays familiar tunes. Experts suggest listening to another song to break the cycle.