खरंच मृत्यूनंतरही व्यक्तीचे केस आणि नखं वाढतात का? पाहा याबाबत काय खरं आणि काय खोटं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 14:03 IST2026-02-25T14:02:42+5:302026-02-25T14:03:30+5:30

Interesting Facts : विज्ञानानुसार, मृत्यूनंतर शरीरात अनेक बदल होतात, पण 'ग्रोथ'चा किस्सा तसा नाहीये, जसा सामान्यपणे सांगितला जातो. चला जाणून घेऊया सत्य नेमकं काय आहे.

Does these body part continue to grow even after death experts reveal the truth | खरंच मृत्यूनंतरही व्यक्तीचे केस आणि नखं वाढतात का? पाहा याबाबत काय खरं आणि काय खोटं...

खरंच मृत्यूनंतरही व्यक्तीचे केस आणि नखं वाढतात का? पाहा याबाबत काय खरं आणि काय खोटं...

Interesting Facts : बऱ्याचदा काही लोकांकडून ऐकायला मिळतं की, मृत्यूनंतरही मनुष्यांचे केस आणि नखं वाढत राहतात. हॉरर शो आणि सिनेमांनी तर या गोष्टीला आणखीनच रहस्यमय बनवलं आहे. पण खरंच असं होतं का की हा केवळ एक भ्रम आहे? एक्सपर्ट सांगतात की, सत्य काहीतरी वेगळंच आहे. विज्ञानानुसार, मृत्यूनंतर शरीरात अनेक बदल होतात, पण 'ग्रोथ'चा किस्सा तसा नाहीये, जसा सामान्यपणे सांगितला जातो. चला जाणून घेऊया सत्य नेमकं काय आहे.

बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, मृत्यूच्या लगेच नंतर हृदय बंद पडतं, त्यानंतर शरीरातील रक्तप्रवाह थांबतो. रक्तप्रवाह थांबल्यावर शरीराचं तापमान कमी होऊ लागतं आणि स्नायू आकुंचन पावतात. वेगवेगळ्या कोशिका मरू लागतात, पण शरीरातील सक्रिय प्रक्रिया हळूहळू बंद होतात.

मुळात नखं आणि केस तेव्हा वाढतात, जेव्हा त्यांच्या मूळात नवीन कोशिका तयार होतात. यासाठी ग्लूकोज आणि ऑक्सीजनची सतत गरज असते. जिवंत शरीरातील हीच ऊर्जा कोशिकांना विभाजित करते. याच प्रक्रियेने नखं पुढे येतात आणि केस लांब होतात. 

जसं आपलं हृदय रक्त पंप करणं बंद करतं, शरीराला ऑक्सीजन आणि ऊर्जा मिळणं बंद होतं. मेंदूच्या कोशिका काही मिनिटांमध्ये मरू लागतात. ऊर्जा नष्ट झाल्यावर कोशिकांचं विभाजन थांबतं. त्यामुळे वैज्ञानिक मानतात की, मृत्यूनंतर केस आणि नखं वाढणं शक्य नाही. 

एक्सपर्ट सांगतात की, मुख्य कारण त्वचा कोरडी पडणं आणि आकुंचन पावणं आहे. मृत्यूनंतर त्वचेतील ओलावा नष्ट होतो आणि त्वचा मागच्या बाजूने खेचली जाते. यामुळे नखं आणि केस आधीपेक्षा जास्त बाहेर आल्यासारखे दिसतात. ज्यामुळे लोकांना भ्रम होतो की, ते वाढत आहेत. हॉरर शो आणि जुन्या किस्स्यांनी हा गैरसमज वाढवला आहे. मेडिकल सायन्स स्पष्टपणे सांगतं की, मृत्यूनंतर केस आणि नखांची वास्तविक वाढ होत नाही. जो बदल दिसतो, तो केवळ त्वचा आकुंचन पावल्याचा परिणाम असतो.

Web Title : क्या मृत्यु के बाद बाल और नाखून बढ़ते हैं? सच्चाई जानिए

Web Summary : अक्सर कहा जाता है कि मृत्यु के बाद बाल और नाखून बढ़ते हैं, जो कि सच नहीं है। त्वचा के सूखने और सिकुड़ने के कारण ऐसा लगता है। कोशिका विभाजन के बिना विकास असंभव है, जो मृत्यु के बाद नहीं होता।

Web Title : Do hair and nails really grow after death? Fact Check

Web Summary : Contrary to popular belief, hair and nails don't grow after death. The illusion is created by skin retracting due to dehydration, making them appear longer. Growth requires cell division, impossible without oxygen and energy post-mortem.