वळू लाल रंग बघून भडकतात तुम्हालाही असंच वाटतं का? सत्य वाचून बसेल आपल्याला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 15:27 IST2025-12-26T15:25:28+5:302025-12-26T15:27:14+5:30
Interesting Facts : खरंच वळू लाल कपडे घातलेल्या व्यक्तींना पाहून किंवा लाल रंग बघून भडकतात का? खरंतर अनेकांना हा प्रश्न पडला असेल, तर याच प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेणार आहोतच.

वळू लाल रंग बघून भडकतात तुम्हालाही असंच वाटतं का? सत्य वाचून बसेल आपल्याला धक्का
Interesting Facts : अनेक सिनेमे किंवा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत आपण पाहिलं असेल की, वळू लाल कपडे घातलेल्या व्यक्तीच्या मागे धावत किंवा लाल रंगाला पाहून हल्ला करतात. काही देशांमध्ये तर याच्या मोठमोठ्या स्पर्धा भरवल्या जातात. ज्यात एक व्यक्ती वळूला लाल रंगाचा कापड धाखवते आणि वळू त्याकडे धावत जातो. पण मुळात हा महत्वाचा प्रश्न आहे की, खरंच वळू लाल कपडे घातलेल्या व्यक्तींना पाहून किंवा लाल रंग बघून भडकतात का? खरंतर अनेकांना हा प्रश्न पडला असेल, तर याच प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेणार आहोतच.
खरंच वळू लाल रंग बघून भडकतात का?
आपल्यालाही कधीना कधी हा प्रश्न पडला असेल की, खरंच वळू लाल रंग बघून भडकतो का? तर याचं उत्तर नाही असं आहे. वळूबाबत अनेकांमध्ये हा एक मोठा गैरसमज आहे. कारण वळूच्या खेळात मेटाडोर आपल्या हातात लाल कपडा घेऊन त्याला खुणावतो आणि आपल्याकडे येण्यास सांगतो. काही सिनेमातही असंच दाखवण्यात आलं आहे. याच कारणाने असं मानलं जातं की, लाल रंग बघून वळू भडकतो. मात्र, यात काहीच तथ्य नाही.
मुळात वळू पार्शिअली कलर ब्लाईंड असतात. त्यांना रंगांची समज नसते. त्यांच्या लाल रिसेप्टरची कमतरता असते. म्हणजे त्यांना लाल रंग स्पष्टपणे दिसतच नाही. ते केवळ पिवळा, हिरवा, निळा आणि जांभळा रंगच बघू शकतात. रेडिनावरील सूक्ष्म कोशिकांमुळेच रंगाची ओळख पटवता येते. अशीच एक सूक्ष्म कोशिका ज्यामुळे लाल रंग ओळखता येतो, ती बैलांमध्ये नसते. हे तर वैज्ञानिकदृष्ट्या स्पष्ट आहे की, वळू लाल रंग बघून भडकत नाही आणि त्यांना लाल रंगही दिसत नाही. वळूच्या खेळात बुलफायटर जेव्हा हातात लाल कपडा घेऊन हलवतो, ती हालचाल पाहून वळू भडकतात.
त्यामुळे वळू लाल रंग बघून किंवा लाल कपडे बघून भडकतो असं म्हणणं चुकीचं ठरेल. ते व्यक्तीची हालचाल किंवा व्यवहार पाहून किंवा इन्सिक्युरिटीच्या कारणाने हल्ला करतात. लोकांना वाटतं की, लाल रंगामुळे भडकला असेल, तर हा फक्त एक गैरसमज आहे.