बोंबला! दोन तरूणांना होती पोटदुखीची समस्या, डॉक्टरने चिठ्ठीवर लिहिलं 'प्रेग्नन्सी टेस्ट करा'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 16:42 IST2019-10-14T16:34:51+5:302019-10-14T16:42:32+5:30
सामान्यपणे पोटदुखीची समस्या झाल्यावर डॉक्टर Ultrasound, Urine Test, Stool Test करायला सांगतात.

बोंबला! दोन तरूणांना होती पोटदुखीची समस्या, डॉक्टरने चिठ्ठीवर लिहिलं 'प्रेग्नन्सी टेस्ट करा'
(Image Credit : elawoman.com)
सामान्यपणे पोटदुखीची समस्या झाल्यावर डॉक्टर Ultrasound, Urine Test, Stool Test करायला सांगतात. पण झारखंडच्या चतरा जिल्ह्यातील एका डॉक्टरने मात्र पोटदुखीची तक्रार करणाऱ्या पुरूषांना चक्क प्रेग्नन्सी टेस्ट करण्यास सांगितले. सोशल मीडियात या डॉक्टरची चिठ्ठी व्हायरल झाली असून लोकांना हसू आवरणं कठीण झालंय.
Hindustan Times च्या एका रिपोर्टनुसार, सरकारी रूग्णालयातील डॉक्टर मुकेश कुमार यांनी गोपाल गंझू आणि कामेश्वर या दोघांना HIV आणि Haemoglobin ची टेस्ट करण्यासही सांगितली. तसेच आरोप असा आहे की, डॉक्टरने चिठ्ठीवर एएनसी म्हणजेच अॅंटी नेटल चेकअपची टेस्टही लिहिली आहे. आता या डॉक्टरच्या चौकशीचे आदेश काढण्यात आले आहेत.
गोपाल गंझू आणि कामेश्वर दोघेही डॉक्टरांनी सांगितल्यानुसार एका खाजगी पॅथॉलॉजी लॅबमध्ये गेले. तेथील व्यक्तीने चिठ्ठी पाहिल्यावर या टेस्ट करण्यास नकार दिला आणि हे सगळं प्रकर ण समोर आलं.
दुसरीकडे आरोप आवण्यात आलेले डॉक्टर मुकेश कुमार यांचं म्हणणं आहे की, त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीवर ओव्हर रायटिंग करण्यात आलं आहे. पण चिठ्ठीवर कुठेच तसं दिसत नाही. डॉक्टर म्हणाले की, हे मला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे.