TVS नाव तर अनेकदा ऐकलं असेल, पण याचा फुल फॉर्म माहीत नसेल; आता जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 13:50 IST2026-02-07T13:49:29+5:302026-02-07T13:50:01+5:30
Interesting Facts : अनेक जण TVS कंपनीची बाईक वापरतही असतील. पण TVS चं पूर्ण नाव काय आहे, हे तुम्हाला माहीत आहे का?

TVS नाव तर अनेकदा ऐकलं असेल, पण याचा फुल फॉर्म माहीत नसेल; आता जाणून घ्या...
Interesting Facts : आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी असतात ज्या रोज आपल्या डोळ्यांसमोरून जातात किंवा कायम आपल्या वापरात असतात. पण त्यांच्याबद्दलची अगदी साधी माहितीही आपल्याला माहीत नसते. कारण साधं असतं त्या गोष्टींबाबत कधी प्रश्नच पडलेला नसतो. एखाद्याने तो प्रश्न विचारल्यावर मात्र आपल्यालाच वाटतं, “अरे हो, हे तर कधी डोक्यातच आलं नाही!” आज आपण अशाच काही रंजक गोष्टी जाणून घेणार आहोत.
TVS चं पूर्ण नाव काय आहे?
बाईक चालवणं अनेकांना आवडतं. मुलं तर चालवतातच, पण आजकाल अनेक मुलीही सुसाट बाईक चालवताना दिसतात. थोडक्यात सांगायचं तर बाईक जवळपास सगळ्यांनाच आवडते. तुम्हीही बाईक चालवत असालच. बाईक म्हटलं की TVS हे नाव तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. अनेक जण TVS कंपनीची बाईक वापरतही असतील. पण TVS चं पूर्ण नाव काय आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? बहुतेकांना नाही, कारण त्याबद्दल कधी विचारच केलेला नसतो. TVS चं पूर्ण नाव Thirukkurungudi Vengaram Sundram असं आहे. हे नाव TVS ग्रुपचे संस्थापक तिरुक्कुरुंगुडी वेंगाराम सुंदरम अयंगर यांच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे.
BMW चं पूर्ण नावही तुम्हाला माहीत नसेल!
आता एका प्रसिद्ध कार कंपनीबद्दल बोलूया. BMW ही अशी कार कंपनी आहे की तिच्या गाड्या जरी प्रत्येकाला परवडत नसल्या, तरी तिचं नाव मात्र सगळ्यांनाच माहीत असतं. पण BMW चं पूर्ण नाव काय आहे, हे फार कमी लोकांना माहीत असतं. BMW चं पूर्ण नाव Bayerische Motoren Werke असं आहे. हे जर्मन नाव आहे. इंग्रजीत यालाच Bavarian Motor Works असं म्हणतात.