शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

काय सांगता? 'इथं' गायीच्या शेणापासून तयार केले जाताहेत दिवे अन् देवतांच्या मुर्ती, पाहा फोटो

By manali.bagul | Updated: November 11, 2020 15:24 IST

या माध्यमातून  नैसर्गिक संसाधनांचा वापर करत नवनवीन वस्तू तयार करण्याच्या प्रक्रियेला प्रोत्साहन मिळत आहे. या मुर्तींमुळे पर्यावरणाला कोणत्याही प्रकारचं नुकसान पोहोचत नाही. 

दिवाळी म्हटलं की पहिल्यांदा डोळ्यासमोर येतात ते सणाची शोभा वाढवणारे दिवे. दिवाळीचा सण अवघ्या तीन ते चार दिवसांवर  येऊन ठेपलाय. बाजारात रंगेबीरंगी दिवे दिसायला सुरूवात झाली आहे. मातीचे, पीओपी मटेरिअलचे, मेणाचे दिवे तुम्हाला माहीतच असतील. आज आम्ही तुम्हाला एका खास प्रकारच्या दिव्यांबद्दल सांगणार आहोत. 

अलिगढमधील एका गौशाळेत गाईच्या शेणापासून दिवे आणि  देवतांच्या मुर्ती तयार केल्या जातात. पूर्वी  दिवाळी किंवा कोणताही सण असल्यास चीनमध्ये तयार करण्यात आलेले साहित्य मोठ्या प्रमाणात विक्री केले जात होते. कोरोनाची माहामारी लक्षात  घेता सध्या भारतात तयार होत असलेल्या वस्तूंना मागणी वाढत आहे. एएनआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार अलिगढच्या श्रीगुरू गौशाळेत हे काम केलं जात आहे. 

या ठिकाणी गाईच्या शेणाचा वापर करून देवाच्या मुर्ती आणि दिवे बनवले जात आहेत. यामुळे स्थानिक प्रवासी मजूरांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होत आहे.  या मुर्ती खूपच सुंदर आणि आकर्षक आहेत. या माध्यमातून  नैसर्गिक संसाधनांचा वापर करत नवनवीन वस्तू तयार करण्याच्या प्रक्रियेला प्रोत्साहन मिळत आहे. या मुर्तींमुळे पर्यावरणाला कोणत्याही प्रकारचं नुकसान पोहोचत नाही. 

याशिवाय छत्तीसगडमधील कोंडागाव येथिल रहिवासी असलेले अशोक चक्रधारी यांनी २४ ते ४० तासांपर्यंत जळणारा मातीचा दिवा तयार केला आहे. शिल्पकार अशोक चक्रधारी यांनी दिलेल्या माहितीनुसार ३५ वर्षांपूर्वी त्यांनी असा दिवा पाहिला होता. आपणही असा दिवा बनवावा असं नेहमी त्यांना वाटत होतं. म्हणून त्यांनी हा दिवा तयार केला आहे.

वृत्तसंस्था एएनआयने अशोक चक्रधारी यांच्या या कामगिरीबद्दल माहिती देत अशोक यांनी तयार केलेल्या दिव्याचे फोटोज पोस्ट केले  होते. अशोक चक्रधारी यांनी सांगितले की, या वर्षी नवरात्रीत त्यांना कोणीतरी फोन करून सांगितलं की, तुम्ही जसा दिवा तयार केला आहे. तसाच दिवा आम्हाला बनवून हवा आहे. अशोक यांना नंतर कळून आलं की, त्यांनी तयार केलेला दिवा तुफान व्हायरल झाला आहे. तेव्हापासून अशोक यांनी रोज ५० ते ६० विशेष दिवे तयार करायला सुरूवात केली. या दिव्यांची किंमत २०० ते २५० रुपये इतकी ठेवली आहे.

टॅग्स :DiwaliदिवाळीJara hatkeजरा हटके