खाद्य पदार्थांच्या पॅकेटवर वेगवेगळ्या रंगांची चिन्हे का असतात? तुम्हालाही माहीत नसेल अर्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 13:30 IST2025-07-28T13:28:53+5:302025-07-28T13:30:27+5:30

Interesting Facts : अनेकजण या खूणांकडे फारसं लक्ष दिसत नाहीत. पण ती असल्याचं माहीत बऱ्याच जणांना असतं. महत्वाची बाब म्हणजे ही खूण केवळ डिझाइनचा भाग नसते.

Different color codes on packaged food and their meaning | खाद्य पदार्थांच्या पॅकेटवर वेगवेगळ्या रंगांची चिन्हे का असतात? तुम्हालाही माहीत नसेल अर्थ

खाद्य पदार्थांच्या पॅकेटवर वेगवेगळ्या रंगांची चिन्हे का असतात? तुम्हालाही माहीत नसेल अर्थ

Interesting Facts : भारतात भरपूर लोक वेगवेगळे पदार्थ खाण्याचे शौकीन असतात. मसालेदार, चकटदार, तेलकट पदार्थ लोक भरपूर खातात. काही लोकांना शाकाहारी गोष्टी आवडतात, तर काहींना मांसाहार. बाजारात कितीतरी रेडिमेड पदार्थ पॅकेटमध्ये मिळतात. मॉल्स, सुपरमार्केट तर या पॅकेज्ड फुडने गच्च भरलेले असतात. लहान मुले असो वा मोठे सगळेच पॅकेज्ड फूड आवडीनं खातात. पण आपण जे काही खातोय त्याबाबत आपल्याला माहिती असली पाहिजे. आपण पाहिलं असेल की, अनेक खाद्य पदार्थांच्या जवळपास सगळ्याच पॅकेट्सवर एक लहान रंगीत खूण असते. ही खूण हिरवी, लाल, पिवळी, निळी किंवा काळ्यात रंगाची असते.

अनेकजण या खूणांकडे फारसं लक्ष दिसत नाहीत. पण ती असल्याचं माहीत बऱ्याच जणांना असतं. महत्वाची बाब म्हणजे ही खूण केवळ डिझाइनचा भाग नसते. ही खूण खाद्य पदार्थाबाबत आणि आपल्या आरोग्यासंबंधी महत्वाची माहिती देत असते. चला तर पाहुयात यांचा अर्थ काय असतो.

हिरवी आणि लाल खूण

हिरवी खूण - पॅकेटवरील हिरवी खूण हे दर्शवते की, यातील प्रॉडक्ट पूर्णपणे शाकाहारी आहे. यात मांस, अंडी किंवा प्राण्यांसंबंधी कोणतेची तत्व नाहीत.

लाल खूण - लाल खूण दर्शवते की, यातील प्रॉडक्ट नॉन-व्हेजिटेरिअन आहे. जर आपण व्हेजिटेरिअन असाल तर याकडे लक्ष द्यायला हवं.

जास्तीत जास्त लोकांना पॅकेटवरील लाल आणि हिरव्या खूणा माहीत असतात. पण इतरही रंगांच्या खूणा यावर असतात. त्यांचा अर्थ पाहुयात.

निळी खूण

पॅकेटवरील निळी खूण दर्शवते की, यातील प्रॉडक्ट औषध आहे. याचा अर्थ याचा वापर आजारात केला जाऊ शकतो. पण डॉक्टरांच्या सल्ल्यानेच.

पिवळी खूण

पिवळ्या रंगाची खूण दर्शवते की, यातील प्रॉडक्ट अंडी आहेत. बरेच लोक अंडी खात नाहीत, त्यांच्यासाठी ही खूण खूप महत्वाची ठरते.

काळी खूण

जर एखाद्या पॅकेटवर काळी खूण असेल तर याचा अर्थ होतो की, त्यात मोठ्या प्रमाणात केमिकल्स आहेत. हे टेस्ट वाढवण्यासाठी, रंग देण्यासाठी किंवा जास्त काळ टिकून राहण्यासाठी टाकले जातात. असे पदार्थ जास्त खाणं आरोग्यासाठी घातक असतं.

एक्सपर्ट सांगतात की, काळी खूण असलेले पदार्थ जास्त खाल्ले तर पचन तंत्र, लिव्हर आणि किडनीमध्ये बिघाड होऊ शकतो. तसेच वेगवेगळ्या आजारांचा धोकाही वाढतो. त्यामुळे यापुढे पॅकेटमधील फूड घेताना या खूणांकडे नक्की बघा. 

Web Title: Different color codes on packaged food and their meaning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.