मध्य प्रदेशातील पन्नामध्ये सापडला दुर्मीळ हिरा, रातोरात लखपती बनला मजूर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 13:03 IST2022-06-08T13:02:41+5:302022-06-08T13:03:26+5:30
Madhya Pradesh : हीरापूर टपरियनचा राहणारा अरविंद कोंदरला जेम क्वालिटीचा हिरा सापडला. ज्याची किंमत लाखो रूपये असल्याचं बोललं जात आहे.

मध्य प्रदेशातील पन्नामध्ये सापडला दुर्मीळ हिरा, रातोरात लखपती बनला मजूर...
Madhya Pradesh : मध्य प्रदेशातील पन्नाच्या रत्नगर्भामध्ये पुन्हा एकदा एका मजुराचं नशीब चमकलं आहे. एक मजुर रातोरात लखपती बनला आहे. हीरापूर टपरियनचा राहणारा अरविंद कोंदरला जेम क्वालिटीचा हिरा सापडला. ज्याची किंमत लाखो रूपये असल्याचं बोललं जात आहे.
अरविंदने सरकारी हिरा कार्यालयात अर्ज केला आणि एक हिरा खदानचा पट्टा घेतला. दिवसरात्र मेहनत करून अरविंदने 5 कॅरेट 70 सेंटचा हिरा शोधला. ज्याची किंमत 25 लाख रूपये सांगितली जात आहे. अरविंदने हिरा सरकारी कार्यालयात जमा केला आहे.
हिरा विभागाचे अनुपम सिंह यांनी सांगितलं की, हा जेम क्वालिटीचा हिरा आहे. आगामी लिलावात हा हिरा विक्रीसाठी ठेवला जाईल. दरम्यान 1 जूनपासून हिरा विभागात 5 लहान-मोठे हिरे जमा करण्यात आले आहेत. या सर्व हिऱ्यांचा लिलाव केला जाईल.
याआधी पन्ना जिल्ह्यातील गाव इंटवाकलामध्ये राहणारी महिला चमेली राणीला पन्नाच्या उथली हिरा खाणीत जवळपास 10 लाख रूपयांचा हिरा सापडला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनेक महिने चमेली राणीने पती अरविंद सिंहसोबत अर्ज देऊन पन्नाच्या कल्याणपूर पट्टीच्या उथली हिरा खाणीत पट्टा भाड्याने घेतला होता. अनेक महिन्यांच्या खोदकामानंतर चमेली आणि तिच्या पतीचं नशीब चमकलं. त्यांना एक चमकदार हिरा सापडला.
हिरा विभागाने हिरा चेक केल्यावर सांगितलं की, हा हिरा 2.08 कॅरेट क्लालिटीचा जेम्स हिरा आहे. ज्याला मार्केटमध्ये चांगली डिमांड असते. कार्यालयानुसार, या हिऱ्याची किंमत जवळपास 10 लाख रूपये आहे.