गरम तेलात हात बुडवले अन् जळत्या निखाऱ्यांवर चालून भक्तांनी केली अयप्पा पूजा; पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2021 04:11 PM2021-01-17T16:11:31+5:302021-01-17T16:14:34+5:30

आतापर्यंत तुम्ही अनेक अशा कथा ऐकल्या किंवा पाहिल्या असतील ज्यात भक्त आगीच्या निखाऱ्यांवर चालून देवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात.

Devotees dipped their hands in hot oil and performed Ayyappa Pooja on burning coals | गरम तेलात हात बुडवले अन् जळत्या निखाऱ्यांवर चालून भक्तांनी केली अयप्पा पूजा; पाहा फोटो

गरम तेलात हात बुडवले अन् जळत्या निखाऱ्यांवर चालून भक्तांनी केली अयप्पा पूजा; पाहा फोटो

Next

भक्तीच्या सागरात बुडलेला व्यक्ती आपल्या आराध्यदेवतेसाठी काही करायला तयार असतो. मग त्यासाठी काहीही करावं लागलं तरी मागे हटण्याची तयारी नसते. फक्त आपल्या आराध्य दैवताला प्रसन्न करणं हेच भक्ताच्या मनात असतं. आतापर्यंत तुम्ही अनेक अशा कथा ऐकल्या किंवा पाहिल्या असतील ज्यात भक्त आगीच्या निखाऱ्यांवर चालून देवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात. पुन्हा एकदा अशीच एक घटना सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येत आहे.  

कर्नाटकातील एका गावात अयप्पा देवाची पूजा लोक अनोख्या पद्धतीनं करत आहेत. मकर संक्रांतीच्या निमित्तानं कर्नाटकातील या गावात भगवान अयप्पाची विशेष पूजा केली जाते. या ठिकाणी भक्त जळत्या निखाऱ्यांवर  चालून, गरम तेलात हात बुडवून देवाची पूजा करतात. मकर संक्रांतीच्या दिवशी कर्नाटकचे शिव अयप्पा जिल्ह्यातील  कुडिगेरे गावातील काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. समोर आली जगभरात कोरोना पसरवणाऱ्या वटवाघळाची नवी प्रजात; रंग पाहून वैज्ञानिकही चकीत

वृत्तसंस्था एएनआयने ट्विट करत यासंबंधी अधिक माहिती दिली आहे. या फोटोतून तुम्ही पाहू शकतो. लोक अयप्पा देवाची पूजा करण्यासाठी या पद्धतींचा अवलंब करत आहेत. मकर ज्योतीच्या  प्रसंगी गरम तेलात हात बुडवून देव अयप्पांची विशेष पूजा केली जात आहे. आता गायीच्या शेणापासून घर रंगवा; 'गोबर पेंटचे' गडकरींनी सांगितले ८ फायदे
 

Web Title: Devotees dipped their hands in hot oil and performed Ayyappa Pooja on burning coals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.