समोर आली जगभरात कोरोना पसरवणाऱ्या वटवाघळाची नवी प्रजात; रंग पाहून वैज्ञानिकही चकीत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 02:06 PM2021-01-15T14:06:33+5:302021-01-15T14:18:01+5:30

Viral trending News in Marathi : आतापर्यंत तुम्ही काळ्या रंगाची वटवाघळं पाहिली असतील. सध्या नारंगी रंगाचा वटवाघूळ दिसून आल्यामुळे वैज्ञानिकसुद्धा हैराण झाले आहेत.  

Scientist found a new species of bat whose color is orange in the west south country guinea | समोर आली जगभरात कोरोना पसरवणाऱ्या वटवाघळाची नवी प्रजात; रंग पाहून वैज्ञानिकही चकीत

समोर आली जगभरात कोरोना पसरवणाऱ्या वटवाघळाची नवी प्रजात; रंग पाहून वैज्ञानिकही चकीत

googlenewsNext

ऊलटी लटकणारी वटवाघळं पाहून माणसाच्या मनात भीतीचं वातावरण तयार होतं. संपूर्ण जगभरात हाहाकार पसरवलेल्या कोरोना व्हायरसच्या संसर्गासाठीही या प्राण्यांना दोषी मानलं जात होतं. चीनमध्ये कोरोना व्हायरस वटवाघळांमधून माणसांमध्ये आला. असं समजलं जात आहे. आतापर्यंत तुम्ही काळ्या रंगाची वटवाघळं पाहिली असतील. सध्या नारंगी रंगाचा वटवाघूळ दिसून आल्यामुळे वैज्ञानिकसुद्धा हैराण झाले आहेत.  

वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार  ही वटवाघळाची एक नवीन प्रजात आहे. या वटवाघळाचा रंग नारंगी आहे. सायंटिफिक जर्नल अमेरिकन म्यूजियम नोविटेट्समध्ये वैज्ञानिकांनी वटवाघळांबाबत आपला अभ्यास प्रकाशित केला आहे. वटवाघळांची नवीन प्रजात असल्याचे समोर आले आहे. 

कुठे दिसून आलं नारंगी वटवाघूळ

आफ्रिकी देशात ही प्रजात दिसून आली आहे. पश्चिमी आफ्रिकी देशात दिसून आलेल्या या नवीन प्रजातीची  वैज्ञानिकअधिक माहिती मिळवत आहेत. टेक्सासच्या ऑस्टीनमध्ये एक राष्ट्रीय संघटनेचे प्रमुख जॉन फ्लँडर्स यांनी दिलेल्या माहितीनुसार हे एकाप्रकारे जीवनाचे उद्दिष्ट असून त्यांना कधी वाटलं ही नव्हतं  हे पूर्ण होईल, प्रत्येक प्रजात ही महत्वाची असते.

त्यांनी सांगितले की, प्रयोगशाळेत अनेक  नवीन प्रजाती शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. जंगलात राहून अशा प्रकारच्या नवीन प्रजाती शोधणं हे खूप वेगळं आणि कठीण काम आहे.  न्यूयॉर्कमध्ये अमेरिकन म्यूजियम ऑफ नेचरल  हिस्ट्रीमधील स्तनधारी प्राण्यांच्या तज्ज्ञ नँसी सीमंस यांनी सांगितले की, ''या प्रजातीची सहज ओळख पटवता येऊ शकते. '' धक्कादायक! 'या' व्यक्तीने शरीरात इंजेक्ट केलं मॅजिक मशरूमचं पाणी, नसांमध्ये उगवू लागले मशरूम....

या वटवाघळाच्या नवीन प्रजातीचे नाव मायओटिस निंबेंसिस आहे आणि ते गिनीच्या निंबा पर्वतावर राहतात. या वटवाघळाच्या अचूक तपासणीसाठी वैज्ञानिकांनी या नवीन प्रजातीतील एक नर आणि एक मादी प्रजाती देखील पकडली. अनुवांशिक विश्लेषणावरून असे दिसून आले आहे की हा केशरी वटवाघूळ जवळच्या प्रजातींपेक्षा पूर्णपणे भिन्न आहे. ही नवीन प्रजाती घोषित करण्याची ही पहिली पायरी  आहे. एक प्रकारे ते काळे पंख असलेल्या आंबा वटवाघळासारखे दिसते परंतु या नारंगी  रंगाने ते लोकप्रिय ठरले आहे. आता गायीच्या शेणापासून घर रंगवा; 'गोबर पेंटचे' गडकरींनी सांगितले ८ फायदे

Web Title: Scientist found a new species of bat whose color is orange in the west south country guinea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.