लग्नाच्या रिसेप्शनमध्ये नववधूने केला असा डान्स, नवरा लाजून चूर, लोक म्हणाले, ‘अश्लील’
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 15:55 IST2021-12-16T15:53:15+5:302021-12-16T15:55:17+5:30
Jara Hatke News: अमेरिकेमधील फ्लोरिडा येथे एका जोडप्याने लग्नामध्ये असे काही केले की ते पाहून लोकांना धक्का बसला. आता या जोडप्याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

लग्नाच्या रिसेप्शनमध्ये नववधूने केला असा डान्स, नवरा लाजून चूर, लोक म्हणाले, ‘अश्लील’
वॉशिंग्टन - लग्नामध्ये किंवा रिसेप्शनमध्ये नवरा नवरीने डान्स करणे ही गोष्ट आता काही नवी राहिलेली नाही. परदेशात तर नाहीच नाही. मात्र अमेरिकेमधील फ्लोरिडा येथे एका जोडप्याने लग्नामध्ये असे काही केले की ते पाहून लोकांना धक्का बसला. आता या जोडप्याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.
अमेरिकेतील फ्लोरिडा येथे एका नवविवाहित महिलेने लग्नाच्या रिसेप्शनमध्ये तिच्या पतीसमोरच लॅपडान्स केला. तिने जेव्हा बॅकलेस ड्रेस घालून पतीसमोर लॅपडान्स केला. तेव्हा तिथे उपस्थित असलेले लोकही बघतच राहिले. लग्नाच्या रिसेप्शनमध्ये वधूचा हा उत्साह पाहून एकवेळ उपस्थितांचा त्यावर विश्वास बसला नाही. ही महिला खूप कमी कपड्यांमध्ये रिसेप्शनमध्ये आलेल्या पाहुण्यांसमोर लॅपडान्स करताना दिसत आहे. तिथे उपस्थित असलेले पाहुणे तिचा हा भन्नाट हॉट डान्स त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड करत होते.
द सन यूकेच्या म्हणण्यानुसार, वधूचे नाव रोशेल असे असून, तिने जेव्हा हा डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला गेला आहे. तसेच तो वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ टिकटॉकवर ३.१ मिलियनपेक्षा अधिक वेळा पाहिला गेला आहे.
व्हिडीओमध्ये रोशेल ही डान्सफ्लोअरवर खुर्चीवर बसलेल्या नवऱ्याच्या जवळ डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओवर युझर्सकडून वेगवेगळ्या कमेंट्स केल्या जात आहेत. कुणी हा व्हिडीओ अश्लील असल्याचे म्हटले आहे. तर कुणी बेभानपणा म्हणून या व्हिडीओवर टीका केली आहे. एका युझरने सांगितले की, महिलेने असा डान्स हा पतीसोबत खासगीपणे केला पाहिजे. तर अन्य एका युझरने सांगितले की, ही त्यांची मर्जी आहे.
तर एका युझरने सांगितले की, ही परंपरा फ्लोरिडामध्ये नाही आहे. तर अन्य एका युझरने सांगितले की, ही वधू तर नाही आहे. सध्या हा व्हिडीओ अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे. जिथे लाखोंच्या संख्येने हा व्हिडीओ पाहत आहेत.