McDonald चं वेड! पठ्ठ्यानं इतकं ऑर्डर केलं की बिल झालं १.८६ लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 18:42 IST2021-08-07T18:33:07+5:302021-08-07T18:42:36+5:30

एका ग्राहकानं पार हद्दच केलीय. या चाहत्यानं मॅक-डी (MacD) मधून इतके पदार्थ ऑर्डर केलेत की त्याचं बिल पाहून सर्वच हैराण झाले आहेत. 

Customer ordered 1 86 lakh rupees food from mcdonalds in australia | McDonald चं वेड! पठ्ठ्यानं इतकं ऑर्डर केलं की बिल झालं १.८६ लाख

McDonald चं वेड! पठ्ठ्यानं इतकं ऑर्डर केलं की बिल झालं १.८६ लाख

खाण्याची आवड अनेकांना असते. खवय्ये मंडळी आपल्या जीभेचे चोचले पुरविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणचे पदार्थ चाखण्यासाठी आवर्जुन जात असतात. तर काही जणांना एखाद्या विशिष्ट ठिकाणचंच जेवण किंवा पदार्थ खूप आवडतात. असे लोक वारंवार अशा ठिकाणाहून पदार्थ ऑर्डर करत असतात. फास्टफूडमध्ये लोकप्रीय ब्रँड असलेल्या मॅकडॉनल्ड या फूड जॉईंटचे देखील कोट्यवधी ग्राहक चाहते आहेत. पण एका ग्राहकानं पार हद्दच केलीय. या चाहत्यानं मॅक-डी (MacD) मधून इतके पदार्थ ऑर्डर केलेत की त्याचं बिल पाहून सर्वच हैराण झाले आहेत. 

McDonald’s  चा बर्गर लोकप्रीय आहे. ऑस्ट्रेलियातील एका मॅक-डी वेड्या चाहत्यानं तब्बल १ लाख ८६ हजार रुपयांची ऑर्डर केली आहे. यात पठ्ठ्यानं ७० क्लबहाऊस बर्गर, ३९ मॅक फॅमेली बॉक्स यात एकूण २३४ बर्गरचा समावेश, ३९ मॅक नगेट्स आणि ६९ लार्ज फ्रेंच फ्राईज ऑर्डर केले आहेत. इतकंच नव्हे, तर या ऑर्डरमध्ये १०० हून अधिक कोल्डड्रिंक्सचाही समावेश आहे. मॅकडॉनल्डमधीलच एका कर्मचाऱ्यानं ग्राहकाच्या या भन्नाट ऑर्डरचं बिल फेसबुकवर पोस्ट केलं आहे. 

मॅक-डीच्या पदार्थांचं वेड असलेल्या या ग्राहकाची ऑर्डर पाहूनच कर्मचारी भांबावून गेले. एक ऑर्डर तब्बल ३४०० डॉलर्सची पाहून तेही चक्रावले. भारतीय चलनानुसार ही ऑर्डर जवळपास १ लाख ८६ हजारांची होते. सोशल मीडियावर देखील या ऑर्डरची जोरदार चर्चा होत असून फोटो तुफान व्हायरल झाला आहे. प्रत्येकजण यावर वेगवेगळी प्रतिक्रिया देत आहे. 

Web Title: Customer ordered 1 86 lakh rupees food from mcdonalds in australia