लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते. लग्नाच्या तयारीसोबत अनेकदा लग्नानंतर हनीमूनला नेमकं कुठं जायचं याचं जोरदार प्लॅनिंग हे हल्ली लग्नाआधीच कित्येक महिन्यांपूर्वी केलं जातं. साधारण 10 ते 15 दिवसांसाठी लोक हनीमूनला जातात. मात्र जर कोणी तब्बल एक वर्ष एखादं कपल हनीमूनला गेलं असं सांगितलं तर सुरुवातीला कोणी विश्वासच ठेवणार नाही. पण हो हे खरं आहे. एका कपलने एका वर्षाची झकास लाँग हनीमून ट्रिप केली आहे. एवढंच नाही तर विशेष म्हणजे या हनीमून ट्रीपमध्ये ते तब्बल 33 देश फिरले आहेत.

फिरण्याची आवड असलेल्या कपलसाठी हनीमून ट्रिप ही खूपच जास्त खास असते. निक आणि जो ऑस्ट या दोघांनाही फिरण्याची आवड असल्याने त्यांनी हटके लाँग हनीमून ट्रिप केली आहे. या कपलने लग्नाच्या दोन वर्षे आधीच यासाठी प्लॅनिंग केलं असून बचत करायला सुरुवात केली होती. लग्नानंतर दोघांनीही नोकरी सोडून जवळपास एक वर्षाची हनीमून ट्रिप केली. लग्नाआधीचं निक आणि जो ऑस्टने एकमेकांना लग्नानंतर खूप फिरण्याचं वचन दिलं होतं. 

न्यू जर्सीमध्ये 31 डिसेंबर 2017 मध्ये निक आणि जो ऑस्टचं लग्न झालं. लग्नानंतर दोघांनी कपड्यांची बॅग भरली आणि ते एका वर्षाच्या हनीमून ट्रिपला निघाले. सेशेल्स हे या दोघांच्या लाँग हनीमून ट्रिपचं 33 वं आणि शेवटचं डेस्टिनेशन होतं. याआधी त्यांनी भारत, मालदीव, तुर्की, न्यूयॉर्क आणि जपानमध्ये हनीमून ट्रिप केली. निक आणि जो ऑस्टने हनीमून ट्रिपचे काही सुंदर फोटो हे आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: couple who honeymooned for a year by travelling 33 countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.