शोना सोबतचा पहिला अपघात...दुर्घटनेनंतर कपलनं शेअर केला सेल्फी, लोकांमध्ये पेटला वाद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 16:29 IST2025-03-06T16:28:18+5:302025-03-06T16:29:45+5:30

First Accident With Bae: एका तरूणीनं तिच्या प्रियकरासोबत झालेल्या पहिल्या अपघाताचा सेल्फी शेअर केलाय. असं करून हा नात्यातील एक महत्वाचा क्षण असल्याचं तिनं म्हटलंय.  

Couple share selfie on social media captioned First accident with bae gone viral | शोना सोबतचा पहिला अपघात...दुर्घटनेनंतर कपलनं शेअर केला सेल्फी, लोकांमध्ये पेटला वाद!

शोना सोबतचा पहिला अपघात...दुर्घटनेनंतर कपलनं शेअर केला सेल्फी, लोकांमध्ये पेटला वाद!

First Accident With Bae: सामान्यपणे प्रेमात असलेले कपल्स त्यांची पहिली डेट, पहिला सिनेमा, पहिलं आउटिंग, पहिलं किस, पहिलं गिफ्ट अशा गोष्टी लक्षात ठेवतात किंवा या क्षणांचे फोटो काढून सोशल मीडियावर शेअरही करतात. पण आता प्रेमाची आणि काही खास क्षण सेलिब्रिट करण्याची व्याख्याच बदलली की काय असा विचार डोक्यात आणणारी एक पोस्ट व्हायरल झाली आहे. सामान्यपणे चांगल्या गोष्टी किंवा एखाद्या इव्हेंटचा सेल्फी पोस्ट करतात. पण एका तरूणीनं तिच्या प्रियकरासोबत झालेल्या पहिल्या अपघाताचा सेल्फी शेअर केलाय. असं करून हा नात्यातील एक महत्वाचा क्षण असल्याचं तिनं म्हटलंय.  

फेसबुक पोस्ट करण्यात आलेल्या या फोटोत तुम्ही बघू शकता की, एक तरूण आणि तरूणी आरशासमोर सेल्फी घेत आहेत. तरूणाच्या डोक्यावर पट्टी बांधलेली आहे, तर तरूणीच्या कपाळावर, नाकावर आणि हातांवर पट्टी आहे. फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं आहे की, बेइ(गर्लफ्रेन्ड)सोबतचा पहिला अपघात. हा फोटो बघून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांनी कमेंट करून दोघांना शुभेच्छाही दिल्या आहेत. तर काही लोकांना अपघाताचं असं सेलिब्रेशन करण्यावर खडेबोलही सुनावले आहेत.

सोशल मीडियावर वाद

तरूण आणि तरूणीच्या या फोटोमुळे आणि त्यांच्या विचारावर सोशल मीडियावर वाद पेटला आहे. काही लोकांना दोघांचं असं करणं आवडलं तर काही लोकांना याला तरूणांमधील बदलत्या मूल्यांचं प्रतीक म्हटलं. काही म्हणाले की, आधुनिक नात्यांमध्ये सोशल मीडियामुळे गंभीर घटना हलक्यात बनवल्या आहेत का? एकानं लिहिलं की, 'ही तर आता सुरूवात आहे, अजून खूप काही बघावं लागणार आहे'. तर काही लोक प्रेमाचे दाखले देत सांगितलं की, प्रेमात जीवनातील प्रत्येक क्षण शेअर करण्याचा समावेश आहे. मग ते वाईट का असेना. 

Web Title: Couple share selfie on social media captioned First accident with bae gone viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.