शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
4
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
5
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
6
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
7
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
8
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
9
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली
10
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
11
'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
12
"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?
13
नवरात्र २०२५: ललिता सहस्रनामाचे नियमित करा पठण, देवी सदैव करेल पाठराखण; अपार लाभ-समृद्धी! 
14
ट्रम्पनी H-1B फीवरून ब्लॅकमेल केले, अमेरिकी कंपनीने भारतातच १२,००० नोकऱ्यांची घोषणा केली...
15
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
16
पुढच्या वर्षी ९४,००० पर्यंत जाणार Sensex; HSBC नं दृष्टीकोन बदलला, भारताचं रेटिंगही वाढवलं
17
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
18
बुद्धिबळाची 'राणी'! वडिलांची साथ, लेकीने रचला इतिहास; बिहारची पहिली महिला FIDE मास्टर
19
Tiger Attack: समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
20
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...

जसा आहेर, तसं जेवण! वर-वधूनं लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेत थेट जेवणाचं 'रेटकार्ड'च छापलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2021 16:55 IST

लग्नाचा खर्च वसुल करण्यासाठी वर-वधूनं लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेतच येणाऱ्या पाहुण्यांसाठी 'रेट कार्ड' छापलं आहे.

वाढत्या महागाईचा सामना करताना सर्वसामान्यांच्या नाकी नऊ आले आहेत. त्यात कोरोनानं तर लोकांचं जगणं कठीण झालं आहे. महागाईच्या काळात आता कौटुंबिक कार्यक्रमाचं आयोजन करायचं म्हटलं तरी लोकांना हातचं राखून खर्च करावा लागत आहे. त्यात लग्न समारंभ म्हटलं की वेगवेगळ्या गोष्टींसाठी बराच पैसा खर्च होतो. यात वऱ्हाडी मंडळीच्या जेवणावर सर्वाधिक खर्च होतो. त्यात जेवण चांगलं नसलं तर पाहुण्यांकडून ठेवली नावं ठेवली जातात ते तर वेगळं सांगायलाच नको. पण जेव्हा वर-वधूला नव्या आयुष्याच्या सुरुवातीसाठी भेटवस्तू देण्याची वेळ येते तेव्हा झालेल्या खर्चाचा कुणी विचार करत नाही. यावर एका जोडप्यानं अनोखी शक्कल लढवली आहे. लग्नाचा खर्च वसुल करण्यासाठी वर-वधूनं लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेतच येणाऱ्या पाहुण्यांसाठी 'रेट कार्ड' छापलं आहे. यात जो जसा आहेर देईल, त्याला त्याच पद्धतीचं जेवणं मिळेल, असा संदेश देण्यात आला आहे. (Couple offer guests food depending on expensive gifts in their wedding and sends them rate card)

लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेसाठी अनोखी डिझाइन्स, हटके संदेश ही अशी अनेक उदाहरणं तुम्ही आजवर पाहिली असतील. पण लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेत चक्क पाहुण्यांना दिल्या जाणाऱ्या जेवणाचं 'रेट कार्ड' छापलं जाण्याचा हा प्रकार चर्चेचा विषय ठरत आहे. लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांना ते नेमका किती खर्च करण्याचा विचार करत आहेत याचा अंदाज त्यांना यावा यासाठी थेट निमंत्रण पत्रिकेतच रेटकार्ड छापण्याचा निर्णय वर-वधूनं घेतला. यात दिल्या जाणाऱ्या आहेराच्या किमतीनुसारच पाहुण्यांच्या जेवणाची वर्गवारी करण्यात आली आहे. 

भोजन समारंभाची माहिती देणाऱ्या रकान्यात चार विभाग करण्यात आले आहेत. यात लव्हिंग गिफ्ट, सिल्वर गिफ्ट, गोल्डन गिफ्ट आणि प्लॅटिनम गिफ्ट अशी नावं देण्यात आली आहेत. चारही विभागासाठी जेवणाची वेगवेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय कोणत्या विभागात समावेश होणारं गिफ्ट किंवा आहेर आणला जाणार आहे याची माहिती लग्नाच्या एक दिवस अगोदर देण्याचीही सूचना पाहुण्यांना देण्यात आली आहे. 

२५० डॉलरपर्यंत आहेर देणाऱ्या पाहुण्यांचा लव्हिंग विभागात समावेश करण्यात आला आहे. यात रोस्ट चिकन किंवा स्वार्डफिश मिळणार आहे. सिल्वर विभागात ५०० डॉलरपर्यंत आहेर देणाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. तर गोल्डन विभागासाठी १ हजार डॉलरपर्यंतचा आहेर आणि प्लॅटिनम विभागातील जेवण पाहुण्यांना हवं असेल तर २५०० डॉलरपर्यंतचं गिफ्ट किंवा आहेर द्यावा लागणार आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल