बोंबला! फॅमिली बीचवरच कपलचे अश्लिल चाळे; लोकांनीच पोलिसांना कळवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 14:51 IST2020-02-06T14:39:48+5:302020-02-06T14:51:30+5:30
समुद्र किनाऱ्यावर फिरायला जाणं सर्वांनाच आवडतं. सुट्टीच्या दिवसात लोक खासकरून बीच असलेल्या ठिकाणी फिरायला जातात.

बोंबला! फॅमिली बीचवरच कपलचे अश्लिल चाळे; लोकांनीच पोलिसांना कळवले
(Image Credit : theknot.com)(प्रातिनिधीक छायाचित्र)
समुद्र किनाऱ्यावर फिरायला जाणं सर्वांनाच आवडतं. सुट्टीच्या दिवसात लोक खासकरून बीच असलेल्या ठिकाणी फिरायला जातात. फॅमिली, मित्र-मैत्रिणी आणि कपल्सही बीचवर समुद्रांच्या लाटांचा आनंद घेत असतात. पण अशाच एका फॅमिली बीचवर एका कपलने असं काही केलं की, सगळेच हैराण झाले.
फिलीपीन्सच्या बोरेके आयलॅंड हा फॅमिली बीच आहे. पण या बीचवर अनेक लोक असतानाही एक कपलले खुलेआम शारीरिक संबंध ठेवू लागलं होतं. जे बघून लोक हैराण झाले. हा सगळा प्रकार बघून लोकांनी लगेच पोलिसांना बोलवले.
धक्कादायक बाब म्हणजे पोलीस आल्यावरही हे कपल त्यांचे चाळे बंद करण्याचं नाव घेत नव्हतं. त्यामुळे दोघांना अटक करण्यात आली. पोलिसांनुसार, ब्रिटीश महिला जस्मीन नेली आणि ऑस्ट्रेलियन पुरूष एंथनी कारिओ नशेत होते. दोघांचंही वय २६ वर्षे आहे.
(Image Credit : in.hotels.com)
पोलिसांनुसार, अटक केल्यानंतर सुद्धा हे कपल पोलिसांच्या गाडीतही अश्लील चाळे करत होते. अटक करताना एंथनीने पळून जाण्याचा देखील प्रयत्न केला होता. पण पोलिसांनी त्याला पळून जाण्याची संधीच दिली नाही.
कपलवर सार्वजनिक ठिकाणी शारीरिक संबंध ठेवण्यासोबतच पोलिसांची सूचना न ऐकण्याचा आरोप लावण्यात आला आहे. पण नंतर दोघांनाही जामिनावर सोडण्यात आले. डेली मेलने दिलेल्या एक वृत्तानुसार, ही घटना गुरूवारी सायंकाळी घडली. सायंकाळी लोक बीचवर लोक परिवारासोबत मोठ्या प्रमाणात येत होते. पोलिसांनी सांगितले की, या कपलवर ट्रायल सुरू केली जाईल. जर ते सुनावणी दरम्यान हजर राहिले नाही तर फिलीपीन्समध्ये प्रवास करण्यावर त्यांना बॅन केलं जाईल.