Coronavirus: काय सांगता? आता कोरोनापासून बचाव करणार 'हे' अनोखे शूज, वाचा कसे...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 01:26 PM2020-06-01T13:26:08+5:302020-06-01T13:46:04+5:30

हे शूज घातल्यानंतर लोकांमध्ये कमीतकमी एक ते दीड मीटरचं अतंर ठेवलं जाईल.

Coronavirus long nosed shoes to help maintain social distance in romania myb | Coronavirus: काय सांगता? आता कोरोनापासून बचाव करणार 'हे' अनोखे शूज, वाचा कसे...

Coronavirus: काय सांगता? आता कोरोनापासून बचाव करणार 'हे' अनोखे शूज, वाचा कसे...

Next

कोरोना व्हायरसचा कहर संपूर्ण जगभरात दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनापासून बचावासाठी वेगवेगळे उपाय शोधले  जात आहेत. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे कोरोनासोबत जगत असताना सोशल डिस्टेंसिंगचं पालन करणं आवश्यक आहे. यादरम्यान रोमानियामध्ये कोरोनापासून लोकांचा बचाव व्हावा यासाठी अनोखी शक्कल लढवण्यात आली आहे. या ठिकाणी सोशल डिस्टेंसिंगचं मेंटेन करणारे शूज तयार करण्यात आले आहेत. या शूजचा वापर केल्यास वावरताना सोशल डिस्टेंसिंगचं पालन केलं जाणार आहे. 

रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार रोमानियामध्ये जवळपास दोन महिन्यांपर्यंत लॉकडाऊन सुरू होता.  त्यानंतर लॉकडाऊनमध्ये जेव्हा शिथिलता देण्यात आली त्यावेळी लोकांकडून सोशल डिस्टेसिंगचं पालन केलं  जात नव्हतं. त्यामुळे शूज विकत असलेल्या विक्रेत्याने असे शूज तयार करण्याचा निर्णय घेतला ज्याद्वारे सोशल डिस्टेंसिंगचं पालन केलं जाईल.

क्लूजच्या ट्रांसिलवियन शहरातील चप्पल तयार करत असलेल्या ग्रिगोर लुप यांनी पाहिले की, लोक सोशल डिस्टेंसिंगचं पालन करत नाहीत. म्हणून त्यांनी लोकांनी एकमेकांपासून लांब राहायला हवं यासाठी लांबच लांब चामड्याचा वापर करून शूज तयार करण्याचं ठरवलं. फक्त ठरवलं नाही तर असे शूज तयार सुद्धा केले. 

रिपोर्टनुसार हे शूज  युरोपीय साईज ७५ नंबरचे आहेच. लूप यांनी सांगितले की, ते ३९ वर्षांपासून चामड्याचे शूज, चपला तयार करत आहेत.  लुप यांनी आपलं दुकान २००१ मध्ये सुरू केलं. आता याच दुकानात लुप सोशल डिस्टेंसिंग मेंटेन करणारे शूज विकणार आहेत. त्यांच्यामते हे शूज घातल्यानंतर लोकांमध्ये कमीतकमी एक ते दीड मीटरचं अतंर ठेवलं जाईल. या शूजचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

बाप रे बाप! नशेत 'त्याने' केलेला कारनामा पाहून डॉक्टर हैराण, तुमचीही बोलती होईल बंद....

ऐ शाब्बाश! 12 वर्षाच्या मुलीने सेव्हिग्स खर्च करून मजूरांना विमानाने पोहोचवले त्यांच्या घरी...

Web Title: Coronavirus long nosed shoes to help maintain social distance in romania myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.