बाप रे बाप! नशेत 'त्याने' केलेला कारनामा पाहून डॉक्टर हैराण, तुमचीही बोलती होईल बंद....

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 11:58 AM2020-06-01T11:58:30+5:302020-06-01T12:05:49+5:30

आतापर्यंत तुम्ही काही लोकांच्या पोटातून केसांचा गोळा, नट-बोल्ट काढल्याचे ऐकले असेल.

Drunk man inserts glass bottle into body through anus, surgically removed in Tamilnadu api | बाप रे बाप! नशेत 'त्याने' केलेला कारनामा पाहून डॉक्टर हैराण, तुमचीही बोलती होईल बंद....

बाप रे बाप! नशेत 'त्याने' केलेला कारनामा पाहून डॉक्टर हैराण, तुमचीही बोलती होईल बंद....

Next

लॉकडाउनदरम्यान अनेक विचित्र घटना समोर आल्या. तळीरामांबाबतही अनेक आश्चर्यकारक घटना समोर आल्या. अशीच एक हैराण करणारी घटना तामिळनाडूच्या नागापट्टिनम जिल्ह्यातून समोर आलीये. आतापर्यंत तुम्ही काही लोकांच्या पोटातून केसांचा गोळा, नट-बोल्ट काढल्याचे ऐकले असेल. पण येथील एका व्यक्तीच्या पोटातून चक्क दारूची बॉटल काढण्यात आली. जी पाहून डॉक्टरही हैराण झालेत. 

येथील एक 29 वर्षीय व्यक्ती 28 मे रोजी म्हणजे गुरूवारी पोटात दुखत असल्याची तक्रार करत नागापट्टिनम सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. पण जेव्हा त्याची तपासणी केली गेली तेव्हा डॉक्टरांनाही धक्का बसला.

शुक्रवारी 2 तास चाललेल्या सर्जरीनंतर या व्यक्तीच्या पोटातून दारूची बॉटल काढण्यात डॉक्टरांना यश आलं. जेव्हा ही व्यक्ती शुद्धीवर आली तेव्हा त्याने सांगितले की, तो नशेत असताना त्याने मलाशया मार्गे बॉटल आत टाकली होती.

तामिळनाडूतील ही घटना तेव्हा समोर आली जेव्हा हळूहळू लॉकडाउन खपलं केलं जात आहे. लॉकडाउन दरम्यान दारूची दुकाने बंद होती. पण नंतर काही राज्यांनी दारूची दुकाने केंद्र सरकारच्या गाइडलाईननुसार आणि कोरोना प्रोटोकॉलनुसार सुरू केली होती.

(Image Credit : bulletinmail.com)

लॉकडाउनमध्ये दारूची दुकाने सुरू झाल्यावर काही ठिकाणी लोक सोशल डिस्टेंसिंग विसरले होते. त्यामुळे लोकांना हलक्या बळाचा वापर लोकांवर करावा लागला होता. किंवा राज्य सरकारांना दारू विक्रीसाठी नवीन व्यवस्था करावी लागली.

Web Title: Drunk man inserts glass bottle into body through anus, surgically removed in Tamilnadu api

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.