अमेरिकेत कोरोना व्हायरसचा थैमान आणखीनच वाढत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सांगितले की, अमेरिका हे जगभरात कोरोनाचं केंद्र झालं आहे. व्हायरसमुळे अर्धी जनता लॉकडाउन झाली आहे. पण अमेरिकेतील तरूणाईवर याचा काहीच परिणाम बघायला मिळत नाहीय. अमेरिकन तरूण कोरोना व्हायरस पार्टी करत आहेत.

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेतील केंटुकी राज्यातील 20 वयोगटातील तरूणांनी नुकतीच कोरोना व्हायरस पार्टी साजरी केली. त्यांनी लॉकडाउनचं उल्लंघन करत एकत्र येऊन ही पार्टी केली. आता रिपोर्ट आला आहे की, कोरोना व्हायरस पार्टीमध्ये एकाला कोरोनाची लागण झाली आहे.

केंटुकीमधील अर्धे लोक घरात कैद

केंटुकी येथील गव्हर्नरनी याबाबत माहिती दिली. गव्हर्नर एंडी बेशिअर म्हणाले की, तरूणांना असं वाटतंय त्यांना कोरोना व्हायरसचा धोका नाही. ते स्वत;ला वेगळं मानतात. त्यामुळे त्यांनी नियमांचं उल्लंघन पार्टीचं आयोजन केलं. ते म्हणाले की, या माहितीने मी हैराण झालो. 

अमेरिकेत कोरोना व्हासरसबाबत गंभीर इशारा देण्यात आला आहे. साधारण प्रत्येक राज्यात हा इशारा दिला आह. न्यूयॉर्क, कॅलिफोर्नियातील आणि इतरही ठिकाणांवरील लोकांना घरीच राहण्याचा इशारा देण्यात आला होता. आता अनेक लोक घरातच आहेत. पण काहींना यांचं गांभीर्य कळत नाहीये.

फ्लोरिडामध्येही अमेरिकन तरूणांनी केली बीचवर पार्टी

गव्हर्नर एंडी बेशिअर  यांनी सांगितले की, असं कॉमनवेल्थ देशात कुठेच होत नाहीये. जसं आमच्या देशातील तरूण करत आहेत. त्यांनी सांगितले की, केंटुकीमध्ये कोरोनाची लागण झालेल्या 163 केसेस आहेत. यात तो तरूण आहे जो पार्टीमध्ये गेला होता. 

केंटुकीमध्ये अमेरिकन तरूणांनी पार्टी केल्याची घटना ही एकुलती एक नाही. याआधीही महामारी दरम्यान फ्लोरिडामध्ये तरूणांनी बीचवर पार्टी केली होती. सध्या अमेरिकेत 50 हजारपेक्षा जास्त लोक कोरोनाच्या जाळ्यात अडकले आहेत. आतापर्यंत 640 पेक्षा जास्त लोकांनी आपला जीव गमावला आहे.


Web Title: Coronavirus : American youth celebrating coronavirus party, Administration said this is madness api

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.