पदवी घेण्यासाठी स्टेजवर गेलेल्या विद्यार्थ्याने शिक्षकांसमोर केले असे कृत्य, पाहून सगळेच झाले थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 17:35 IST2022-09-21T17:29:28+5:302022-09-21T17:35:26+5:30
एका कॉलेजमध्ये पदवी घेत असतानाचा एका विद्यार्थ्याचा रिल व्हायरल झाला आहे. व्यासपीठावर एक विद्यार्थी पदवी घेत असताना शिक्षकांसमोर तो असं कृत करतो ज्याने सगळ्या सभागृहात हशा पिकला आहे.

पदवी घेण्यासाठी स्टेजवर गेलेल्या विद्यार्थ्याने शिक्षकांसमोर केले असे कृत्य, पाहून सगळेच झाले थक्क
नवी दिल्ली : आजचे युग हे डिजिटल युग म्हणून ओळखले जाते. सध्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला आहे. यातच सोशल मीडियाचे भन्नाट प्लॅटफॉम आलेत. यात इन्स्टाग्रम, फेसबुक, व्हॉट्सअॅप आहेत. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर रिल्स आले आहेत. यामध्ये काहीजण सिनेमातील डायलॉग तर डॉन्सचे रिल्स बनवतात. आता एका कॉलेजमध्ये पदवी घेत असतानाचा एका विद्यार्थ्याचा रिल व्हायरल झालाय.व्यासपीठावर एक विद्यार्थी पदवी घेत असताना शिक्षकांसमोर तो असं कृत करतो ज्याने सगळ्या सभागृहात हशा पिकला आहे.
हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये एका महाविद्यालयाच्या दीक्षांत समारंभात एका विद्यार्थ्याने व्यासपीठावर उपस्थित प्रमुख पाहुणे आणि शिक्षकांसमोर असे काही केले, जे पाहून सगळेच थक्क झाले.यात सुरुवातीला दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करताना दिसत आहेत.
काय सांगता! बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी तब्बल २५ हजार किलोमीटरचा प्रवास, अन्...
दरम्यान, एका विद्यार्थ्याला पदवी घेण्यासाठी व्यासपीठावर बोलावले जाते.यावेळी विद्यार्थी वर येताच 'काला चष्मा' गाण्यावर तो हुक स्टेप्स करू लागतो, जे पाहून तेथे उपस्थित असलेले सर्वजण आधी स्तब्ध होतात, नंतर हसायला लागतात.
व्हिडिओमध्ये प्रमुख पाहुणे आणि प्राचार्य हसत हसत विद्यार्थ्याला पदवी देताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून त्याला खूप पसंती मिळत आहे.
रेस्टॉरंटमधून जेवण ऑर्डर केले अन् पार्सलच्या बॅगमध्ये अचानक ४३ हजार सापडले, मग..
हा व्हिडिओ शेअर करताना,'व्हायरल, डिस्क्लेमर: कृपया हा प्रयत्न करू नका, मी लोकांना असे करण्यास प्रोत्साहित करत नाही' असे कॅप्शन लिहिले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.