'या' बेटावर रस्त्यांपासून ते घरांपर्यंत सगळीकडेच दिसतात केवळ खेकडे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 13:39 IST2019-09-06T13:30:59+5:302019-09-06T13:39:34+5:30
सामान्यपणे खेकडे रस्त्यावर फारच कमी बघायला मिळतात. मात्र, ऑस्ट्रेलियामध्ये एक असं बेट आहे, जिथे सगळीकडे तुम्हाला केवळ खेकडेच खेकडे बघायला मिळतील.

'या' बेटावर रस्त्यांपासून ते घरांपर्यंत सगळीकडेच दिसतात केवळ खेकडे!
सामान्यपणे खेकडे रस्त्यावर फारच कमी बघायला मिळतात. मात्र, ऑस्ट्रेलियामध्ये एक असं बेट आहे, जिथे सगळीकडे तुम्हाला केवळ खेकडेच खेकडे बघायला मिळतील. या बेटावर असं वाटतं की, खेकड्यांचा जणू पाऊस पडलाय. रस्त्यांपासून ते घरांपर्यंत सगळीकडे तुम्हाला केवळ खेकडेच बघायला मिळतील.
या बेटाचं नाव आहे क्रिसमस बेट. क्वींसलॅंडमध्ये हे बेट आहे. इथे दरवर्षी कोट्यवधी खेकड्यांना एकत्र बघायला मिळतं. रस्ते, जंगल, घरे, रेस्टॉरन्ट, बार, बस स्टॉप सगळीकडेच केवळ खेकडे बघायला मिळतात.
(Image Credit : latrobe.edu.au)
हे खेकडे दरवर्षी प्रजननासाठी क्रिसमस बेटाच्या एका टोकावर असलेल्या जंगलातून दुसऱ्या टोकावर असलेल्या भारतीय महासागरापर्यंत प्रवास करून येतात.
(Image Credit : haydensanimalfacts.com)
या खेकड्यांमुळे रस्ते पूर्णपणे लाल होतात. हजारो खेकडे तर गाड्यांखाली येऊन मरतात सुद्धा. मात्र, जागोजागी बोर्डांवर गाडी हळू चालवण्याचे मेसेजही लिहिलेले आहेत. काही ठिकाणी तर रस्तेच बंद केले जातात.
(Image Credit : Social Media)
क्रिसमस बेट हे ५२ वर्ग मैल क्षेत्रफळात पसरलेलं आहे आणि येथील लोकसंख्या साधारण २ हजार आहे. असं असूनही इथे मोठ्या संख्येने लोक खेकडे बघायला येतात.