रिअल लाइफ जुदाई! विवाहित व्यक्तीच्या प्रेमात पडली, घटस्फोटासाठी पत्नीला दिले १.४ कोटी रूपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 13:38 IST2024-12-20T13:37:23+5:302024-12-20T13:38:29+5:30

चीनमधील एक महिला ऑफिसमध्ये सोबत काम करणाऱ्या एका विवाहित व्यक्तीच्या प्रेमात पडली. त्याला मिळवण्यासाठी ती १.४ कोटी रूपये देण्यास तयार होती.

China woman gives 1 4 crore rupees to wife for divorce to husband | रिअल लाइफ जुदाई! विवाहित व्यक्तीच्या प्रेमात पडली, घटस्फोटासाठी पत्नीला दिले १.४ कोटी रूपये

रिअल लाइफ जुदाई! विवाहित व्यक्तीच्या प्रेमात पडली, घटस्फोटासाठी पत्नीला दिले १.४ कोटी रूपये

१९९७ साली दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी, उर्मिला मांतोडकर आणि अनिल कपूरचा 'जुदाई' सिनेमा आला होता. ज्यात उर्मिला ही विवाहित अनिल कपूरच्या प्रेमात पडते. अशात त्याला मिळवण्यासाठी ती श्रीदेवीला वेगवेगळी आमिषं आणि पैसे देते. धक्कादायक बाब म्हणजे अशीच एक खरीखुरी घटना समोर आली आहे.

चीनमधील ही घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. फक्त त्यात एक छोटा ट्विस्ट आहे. 'साऊथ चायना मॉर्निंग' पोस्टनुसार, चीनमधील एक महिला ऑफिसमध्ये सोबत काम करणाऱ्या एका विवाहित व्यक्तीच्या प्रेमात पडली. त्याला मिळवण्यासाठी ती १.४ कोटी रूपये देण्यास तयार होती. पण पुढे जे घडतं ते चांगलंच इंटरेस्टींग आहे.

व्यक्तीच्या पत्नीला दिले १.४ कोटी रूपये

SCMP च्या रिपोर्टनुसार, शी नावाची महिला तिच्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या हान नावाच्या व्यक्तीच्या प्रेमात पडते. त्याला मिळवण्यासाठी ती त्याला पत्नीला घटस्फोट देण्यास सांगते. या बदल्यात महिला त्याच्या पत्नीला २.४ मिलियन युआन म्हणजे भारतीय करन्सीनुसार, २ कोटी ८० लाख रूपये देण्यास तयार असते. त्यानंतर २०२२ मध्ये महिलेने हानच्या पत्नीच्या अकाऊंटमध्ये १.२ मिलियन युआन म्हणजे १.४ कोटी रूपये टाकले.

यानंतर व्यक्तीची पत्नी महिलेला वर्षभर ताटकळत ठेवते आणि आपल्या पत्नीला घटस्फोटही देत नाही. जेव्हा शी प्रियकराच्या पत्नीकडे पैसे परत मागते तेव्हा ती पैसे परत देण्यास नकार देते. त्यानंतर शी तिच्याविरोधात कोर्टात केस दाखल करते.

कोर्टात शी सांगते की, तिने व्यक्तीची पत्नी यांगसोबत घटस्फोटासाठी ‘वर्बल एग्रीमेंट’ केलं होतं. म्हणजे दोघींमध्ये याबाबत बोलणं झालं होतं. अशात शी म्हणाली की, यांगने एग्रीमेंट तोडल्याने तिने पैसे व्याजासह परत करावे. पण कोर्टाने तिचे दावे फेटाळले. 
दरम्यान, शी आणि यांगमध्ये आता घटस्फोट झाला आहे. ते ३० दिवसांच्या 'कूलिंग पिरिअड'वर आहेत. ज्यात त्यांना त्यांचं नातं सुधारण्यासाठी आणखी एक संधी देण्यात आली आहे.
 

Web Title: China woman gives 1 4 crore rupees to wife for divorce to husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.