Airplane Interesting Facts: हल्ली विमानाने प्रवास करणं बरंच सोपं झालं असलं आणि बरेच लोक विमानाने प्रवास करत असले तरी बहुतांश लोकांना विमानप्रवासाची संबंधित नियमांची त्यांना फारशी माहिती नसते. प्रवाशांची सुरक्षितता आणि सोय यासाठी संबंधित मंत्रालये आणि एअरलाईन्सकडून काही नियम निश्चित केले जातात, ज्यांचे पालन करणे अनिवार्य असते. मात्र आज आम्ही तुम्हाला फ्लाइटशी संबंधित असा एक नियम सांगणार आहोत, ज्याचा विचार तुम्ही स्वप्नातही केला नसेल. कधी तुम्ही विचार केला आहे का की, फ्लाइटमध्ये जन्मलेलं मूल कोणत्या देशाचं नागरिक ठरतं? जर तुम्हाला याबाबत माहिती नसेल, तर आज त्याचं उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत.
प्रेग्नेंसीमध्ये फ्लाइटने प्रवास करता येतो का?
सगळ्यात आधी हा प्रश्न येतो की, “प्रेग्नेंसीमध्ये फ्लाइटने प्रवास करता येतो का?” तर flight-delayed.com च्या एका ब्लॉगनुसार, गर्भधारणेच्या ३६ आठवड्यांपर्यंत विमानप्रवास सुरक्षित मानला जातो. जर गर्भधारणेदरम्यान जुळी किंवा एकापेक्षा जास्त बाळं असतील, तर ३२ आठवड्यांपर्यंत फ्लाइटमध्ये प्रवास करता येतो. मात्र कोणताही निर्णय घेण्यापूर्वी गर्भवती महिलेची प्रकृती लक्षात घेऊन डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे, कारण साधारणपणे डॉक्टर ३६ आठवड्यांनंतर विमानप्रवासाचा सल्ला देत नाहीत.
फ्लाइटमध्ये जन्मलेलं मूल कोणत्या देशाचं नागरिक ठरतं?
फ्लाइटमध्ये बाळ जन्माला आलं की, सर्वात आधी पालकांच्या मनात हा प्रश्न येतो की, आपल्या बाळाला कोणत्या देशाची नागरिकता मिळणार? याचं उत्तर असं आहे की, फ्लाइटमध्ये जन्मलेल्या बाळाच्या नागरिकतेचे नियम प्रत्येक देशात वेगवेगळे आहेत. उदाहरणार्थ, अमेरिकेत बाळाची नागरिकता त्या वेळी फ्लाइट ज्या हवाई क्षेत्रातून जात असते, त्यावर अवलंबून असते. अमेरिकेचा हा नियम ‘जस सोली’ म्हणजेच भूमीचा अधिकार म्हणून ओळखला जातो. या नियमानुसार, अशा परिस्थितीत बाळाला आपोआप अमेरिकन नागरिकत्व मिळू शकतं. पण याबाबत आधीची माहिती घेणं गरजेचं आहे.
युनायटेड किंगडमचा कायदा काय सांगतो?
जर एखादी फ्लाइट युनायटेड किंगडमच्या हवाई हद्दीतून जात असताना बाळाचा जन्म झाला, तरी त्या बाळाला यूकेचं नागरिकत्व मिळेलच असं नाही. कारण यूकेमध्ये ‘जस सॅंग्विनिस’ म्हणजेच ‘रक्ताचा अधिकार’ हा सिद्धांत लागू होतो. या नियमानुसार, बाळाची नागरिकता त्याच्या आई-वडिलांच्या नागरिकतेवर ठरते.
समुद्री क्षेत्रात बाळ जन्माला आलं तर काय?
रिपोर्ट्सनुसार, हवाई प्रवासादरम्यान काही असे भाग येतात, जे कोणत्याही देशाच्या हद्दीत येत नाहीत. जर अशा भागात फ्लाइटमध्ये बाळाचा जन्म झाला, तर त्याच्या जन्म प्रमाणपत्रावर जन्मस्थान म्हणून ‘आंतरराष्ट्रीय’ असं नमूद केलं जातं. मात्र, जर आंतरराष्ट्रीय समुद्री क्षेत्रात बाळाचा जन्म झाला, तर जन्मस्थानाच्या ठिकाणी ‘समुद्रात’ असं लिहिलं जातं.
फ्लाइटमध्ये जन्मलेल्या बाळाला आयुष्यभर मोफत प्रवास?
अनेक लोकांचा असा गैरसमज असतो की, फ्लाइटमध्ये जन्मलेल्या बाळाला आयुष्यभर मोफत विमानप्रवासाची सुविधा मिळते. जर तुम्हीही असंच समजत असाल, तर हे चुकीचं आहे. कारण प्रत्येक एअरलाईनचे नियम वेगवेगळे असतात. काही मोजक्याच एअरलाईन्स फ्लाइटमध्ये जन्मलेल्या बाळाला आयुष्यभर मोफत प्रवासाची सुविधा देतात. रिपोर्ट्सनुसार, थाई एअरवेज, एशिया पॅसिफिक एअरलाईन्स, एअरएशिया, पोलर एअरलाईन्स आणि इजिप्टएअर या एअरलाईन्स अशा बाळांना लाइफटाइम फ्री ट्रॅव्हल देतात. तर वर्जिन अटलांटिकसारख्या एअरलाईन्स बाळाला 21 वर्षांपर्यंत मोफत प्रवासाची सुविधा देतात.
Web Summary : Citizenship for babies born mid-flight depends on the country's laws and airspace. Some countries follow land rights, granting citizenship based on where the birth occurs. Others adhere to bloodline principles, determining citizenship by parents' nationality. Free lifetime flights are rare, varying by airline policy.
Web Summary : उड़ान के दौरान पैदा हुए बच्चों की नागरिकता देश के कानूनों और हवाई क्षेत्र पर निर्भर करती है। कुछ देश भूमि अधिकारों का पालन करते हैं, जन्मस्थान के आधार पर नागरिकता देते हैं। अन्य रक्तरेखा सिद्धांतों का पालन करते हैं, माता-पिता की राष्ट्रीयता द्वारा नागरिकता निर्धारित करते हैं। मुफ्त आजीवन उड़ानें दुर्लभ हैं, जो एयरलाइन नीति के अनुसार अलग-अलग हैं।