एका महिलेला छम्मक छल्लो बोलला नी तुरुंगात गेला, ठाण्यातली घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2017 13:49 IST2017-09-04T11:40:32+5:302017-09-04T13:49:54+5:30

महिलेला गलिच्छ शब्दाने हाक मारल्याबद्दल एका व्यक्तिला ठाणे कोर्टातील न्यायाधीशांनी 1 रुपया दंड आणि कोर्ट संपेपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा दिली आहे. आठ वर्षांपूर्वी घोडबंदर येथे राहणाऱ्या या व्यक्तिला ही शिक्षा इंडियन पीनल कोडच्या 509 अंतर्गत करण्यात आली.

calling woman Chhammak challo lands him in jail | एका महिलेला छम्मक छल्लो बोलला नी तुरुंगात गेला, ठाण्यातली घटना

एका महिलेला छम्मक छल्लो बोलला नी तुरुंगात गेला, ठाण्यातली घटना

ठळक मुद्देमहिलेचा पाय आरोपी व्यक्तिच्या केराच्या बादलीला लागला व बादली उलटी झालीया महिलेने व तिच्या पतीने ही बादली मुद्दामहून पाडल्याचा आरोप करत त्याने तिला छम्मक छल्लो म्हटले

ठाणे, दि. 4 - महिलेला गलिच्छ शब्दाने हाक मारल्याबद्दल एका व्यक्तिला ठाणे कोर्टातील न्यायाधीशांनी 1 रुपया दंड आणि कोर्ट संपेपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा दिली आहे. आठ वर्षांपूर्वी घोडबंदर येथे राहणाऱ्या या व्यक्तिला ही शिक्षा इंडियन पीनल कोडच्या 509 अंतर्गत करण्यात आली. महिलेचा अवमान करणारे शब्द अथवा हावभाव केल्यास या कलमांतर्गत गुन्हा दाखल होतो.
सदर व्यक्ति एका इमारतीतील चौथ्या मजल्यावर राहते. तर पाचव्या मजल्यावर तक्रारदार महिला राहते. 9 जानेवारी 2009 रोजी ही महिला व तिचा पती सकाळी सव्वा नऊ वाजता फेरफटका मारून परतत होते. आपल्या फ्लॅटमध्ये जाताना या महिलेचा पाय आरोपी व्यक्तिच्या केराच्या बादलीला लागला व बादली उलटी झाली. यामुळे आरोपी पुरुषाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. या महिलेने व तिच्या पतीने ही बादली मुद्दामहून पाडल्याचा आरोप करत त्याने तिला छम्मक छल्लो म्हटले. हे शब्द महिलेचे पावित्र्य भंग कराणारे असून या शब्दांमुळे माझा अपमान झाल्याचा आरोप या महिलेने केला.
तिने सदर व्यक्तिविरोधत सोसायटीकडे तक्रार केली परंतु तिची दखल घेण्यात आली नाही. अखेर या महिलेने कायद्याची मदत घेतली. सदर पुरुषाने न्यायालयात युक्तिवाद केला की या महिलेने जाणुनबुजून आपल्याला त्रास दिला व केराची बादली मुद्दाम पाडली. परंतु न्यायाधीशांनी त्याची बाजू अयोग्य ठरवली.
छम्मक छल्लो हे हिंदी शब्द आहेत. इंग्रजीत त्यांना काही अर्थ नाही असे सांगतानाच न्यायाधीशांनी भारतीय संदर्भात या शब्दांचा अर्थ लावला पाहिजे असे सांगत हे शब्द महिलेचा अपमान करणारे असल्याचा निष्कर्ष काढला. हे शब्द महिलेचा सन्मान करण्यासाठी नाही तर तिला हीन लेखण्यासाठी वापरले जातात असेही त्यांनी सांगितले. हे शब्द ऐकल्यावर कुठल्याही महिलेला मानसिक त्रासच होतो, त्यामुळे कलम 509 अंतर्गत महिलेचा अवमान झाल्याचे सिद्ध होत असल्याचा निष्कर्ष न्यायाधीश आर. टी. इंगळे यांनी काढला.
अखेर, न्यायाधीशांनी छम्मक छल्लो हे शब्द वापरत महिलेची बदनामी करणाऱ्या या पुरुषाला एक रुपया दंड व कोर्ट संपेपर्यंतचा दिवस तुरुंगात घालवण्याची शिक्षा दिली.

Web Title: calling woman Chhammak challo lands him in jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.