बुर्ज खलिफामध्ये स्पा मसाजसाठी किती पैसे मोजावे लागतात? पॅकेजची किंमत वाचून चक्रावेल डोकं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 15:44 IST2026-02-05T15:44:29+5:302026-02-05T15:44:56+5:30

Burj Khalifa Interesting Facts: आज आम्ही आपल्याला बुर्ज खलिफामध्ये स्पा मसाज कुठे मिळते आणि त्यासाठी किती पैसे मोजावे लागतात, याबाबत सांगणार आहोत.

Burj Khalifa Interesting Facts: What is the spa massage price in Burj Khalifa | बुर्ज खलिफामध्ये स्पा मसाजसाठी किती पैसे मोजावे लागतात? पॅकेजची किंमत वाचून चक्रावेल डोकं

बुर्ज खलिफामध्ये स्पा मसाजसाठी किती पैसे मोजावे लागतात? पॅकेजची किंमत वाचून चक्रावेल डोकं

Burj Khalifa Interesting Facts: दुबई म्हटलं की, सगळ्यात आधी सगळ्यांच्या डोळ्यांसमोर जगातील सगळ्यात उंच इमारत बुर्ज खलिफा येते. बुर्ज खलिफाच्या अनेक इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्याची लोकांमध्येही मोठी उत्सुकता असते. बुर्ज खलिफा इमारतीची भव्यता फोटो बघूनही येऊ शकते. येथील लाइफस्टाईल, महागडी घरं, मॉल्स, सुविधा अशा कितीतरी गोष्टी नेहमीच चर्चेचा विषय असतात. अर्थात इतक्या मोठ्या इमारतीमध्ये कोणत्याही सेवा - सुविधा महागड्याच असणार. अनेक गोष्टी तर आपणही कुठे ना कुठे वाचल्या असतील. पण आज आम्ही आपल्याला बुर्ज खलिफामध्ये स्पा मसाज कुठे मिळते आणि त्यासाठी किती पैसे मोजावे लागतात, याबाबत सांगणार आहोत. जेणेकरून आपण कधी दुबईला जाण्याचा प्लॅन केला तर आपल्याला हे माहीत असावं.

बुर्ज खलिफात स्पा मसाज कुठे?

दुबईच्या बुर्ज खलिफामध्ये एक ५ स्टार अरमानी हॉटेल आहे. हे हॉटेल प्रसिद्ध फॅशन आयकॉन जियोर्जियो अरमानी यांनी डिझाइन केलं होतं. हे हॉटेल अनेक मजल्यांवर पसरलेलं आहे. यात अनेक लक्झरी सुविधांसोबत स्पा मसाजची सेवाही मिळते. बुर्ज खलिफामध्ये स्पासाठी वेगवेगळे पॅकेजेस आहेत. ज्यात खाण्या-पिण्यापासून ते थर्मल बाथ, स्वीमिंग पूल आणि लाउंज या गोष्टींचा समावेश आहे. इथे थेरपी सेशन्समध्ये ग्राहकांना स्पा एक्सपर्टकडून सेवा पुरवली जाते. यात वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात.

किती पैसे लागतात?

बुर्ज खलिफामध्ये वेळेनुसार स्पा थेरपीसाठी पैसे मोजावे लागतात. म्हणजे इथे ६ हजारांपासून ते ७८ हजारांपर्यंत स्पा थेरपी उपलब्ध आहेत. यात अनेक सेशन आणि थेरपींचा समावेश आहे. हे पॅकेजेस खालीलप्रमाणे बघता येतील.

३० मिनिट स्पा थेरपीसाठी साधारण ११ हजार रूपये

६० मिनिट स्पा थेरपीसाठी साधारण १८ हजार रूपये

९० मिनिटांसाठी साधारण २४ हजार रूपये

१२५ मिनिटांसाठी साधारण २९ हजार रूपये

१५० मिनिटांसाठी साधारण ३२ हजार रूपये

हाड डे बॉडी मसाजसाठी साधारण ७१ हजार रूपये

फुल डे बॉडी मसाजसाठी साधारण ७८ हजार रूपये

हाफ डे मसाज सेशनमध्ये फेशिअल, बॉडी स्क्रब, रॅप आणि स्पा लंचचा समावेश आहे. तर फुल डे सेशनमध्ये आपल्या आवडीची बॉडी ट्रीटमेंट, मेनीक्योर, पेडीक्योर, स्पा लंच, स्पा डिनर इत्यादी गोष्टींचा समावेश असतो.

Web Title : बुर्ज खलीफा में स्पा: मसाज की महंगी दरें, पैकेज चौंकाने वाले!

Web Summary : बुर्ज खलीफा के अरमानी होटल में शानदार स्पा अनुभव उपलब्ध हैं। पैकेज ₹6,000 से ₹78,000 तक हैं, जिसमें मसाज, थर्मल बाथ और भोजन शामिल है। हाफ-डे और फुल-डे विकल्पों में विस्तृत उपचार और भोजन शामिल हैं।

Web Title : Burj Khalifa Spa: Pricey massages revealed; packages shock!

Web Summary : Burj Khalifa offers luxurious spa experiences at the Armani Hotel. Packages range from ₹6,000 to ₹78,000, including massages, thermal baths, and dining. Half-day and full-day options offer extensive treatments and meals.