VIDEO : चोरी करायला गेला अन् ३ तास ग्रीलमध्ये तसाच अडकून राहिला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 15:21 IST2021-03-19T15:17:43+5:302021-03-19T15:21:39+5:30
एक पोटधरून हसायला लावणारी घटना समोर आली आहे. एक चोर चोरी करायला गेला आणि त्याचं डोकं ग्रीलमध्ये अडकलं.

VIDEO : चोरी करायला गेला अन् ३ तास ग्रीलमध्ये तसाच अडकून राहिला!
चोरीच्या आणि चोरांच्या अनेक विचित्र घटना नेहमीच समोर येत असतात. कधी कधी चोरी करण्यासाठी गेलेल्या चोरांची अशी फजिती होते, ज्याचा त्यांनी कधी विचारही केलेला नसतो. अशीच एक पोटधरून हसायला लावणारी घटना समोर आली आहे. एक चोर चोरी करायला गेला आणि त्याचं डोकं ग्रीलमध्ये अडकलं. तो थोडा वेळ नाही तर तब्बल तीन तास तिथेच अडकून राहिला.
इंडिया टाइम्सच्या रिपोर्टनुसार, ही व्यक्ती चोरीच्या करण्याच्या उद्देशाने घरात घुसली होती. तेव्हाच त्याचं डोकं ग्रीलमध्ये अडकलं. तो त्यातून बाहेरच येऊ शकत नव्हता. त्याला मदतीची गरज होती. तिथे उभे असलेल्या लोकांनी सांगितले की, तो तिथे २ तासापेक्षा जास्त वेळ अडकून होता. यादरम्यान कुणीही त्याच्या मदतीला आलं नाही.
नंतर आपातकालीन सर्व्हिसचे लोक आले. शेजाऱ्यांनी पोलिसांना फोन केला. पोलिसही आले. तोपर्यंत चोर तिथेच ग्रीलवर अडकून बसला होता. कटरने ग्रीलचे रॉड कापण्यात आले. त्यानंतर त्याचं अडकलेलं डोकं काढण्यात आलं. पोलीस त्याला नंतर तुरूंगात घेऊन गेले.