चोरी करायला गेलेला चोर बाथरूममध्ये आंघोळ करत होता, मालकाने टॉवेलमध्ये त्याला धरलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 18:44 IST2021-06-16T18:42:05+5:302021-06-16T18:44:41+5:30

अमेरिकेतील कॅलिफोर्नियात चोराने असा काही कारनामा केला जी वाचून तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही. झालं असं की, एक चोर चोरी करायला एका कपलच्या घरात गेला.

Burglar breaks into home at night and takes shower owner caught him wrapped in a towel | चोरी करायला गेलेला चोर बाथरूममध्ये आंघोळ करत होता, मालकाने टॉवेलमध्ये त्याला धरलं...

चोरी करायला गेलेला चोर बाथरूममध्ये आंघोळ करत होता, मालकाने टॉवेलमध्ये त्याला धरलं...

चोरीच्या वेगवेगळ्या विचित्र घटना समोर येत असतात. काही दिवसांपूर्वी एक घटना समोर आली होती की, चोर एका पोलिसाच्या घरात चोरी करायला गेला आणि एसीच्या गारव्यात तिथेच झोपला. आता अशीच एक वेगळी घटना घडली आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियात चोराने असा काही कारनामा केला जी वाचून तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही. झालं असं की, एक चोर चोरी करायला एका कपलच्या घरात गेला. तो आत जाऊन चोरी करण्याचं सोडून आंघोळ करू लागला. 

टाइम्स नाउच्या रिपोर्टनुसार, ही घटना ३ जूनची आहे. स्टीव बाउरच्या पत्नीला घरात जवळपास ११ वाजता पाण्याचा आवाज येऊ लागला होता. तिला वाटलं एखादा कॉक उघडा राहिला असेल. ती उठली तर तिला दरवाज्याची काच तुटलेली दिसली. (हे पण वाचा : पतीने केला पत्नीचा भांडाफोड, म्हणाला - पत्नीने मैत्रिणीसोबत अन् तिच्या पतीसोबत ठेवले संबंध)

यानंतर तिच्या पतीने बंदूक घेतली. त्याने पाण्याचा आवाज कुठून येतोय याचा शोध घ्यायला सुरू केली. जेव्हा ते पायऱ्यांवर पोहोचले तर त्यांना दिसलं की, चोर त्यांचा टॉवेल घालून आंघोळ करत होता. सीएनएननुसार, या व्यक्तीचं नाव Carrola Tiago-Freitas आहे. तो काच तोडून घरात शिरला होता.

स्टीवने सांगितलं की, जसं चोरांनी त्यांच्याकडे पाहिलं त्यांनी त्याच्यावर बंदूक ताणली. जेणेकरून त्याने पळून जाऊ नये. त्यांनी हेही सांगितलं की, बंदूक रिकामी होती. म्हणजे त्यात गोळ्या नव्हत्या. नंतर त्यांनी पोलिसांना फोन केला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून चोराला ताब्यात घेतलं. पण विचार करण्यासारखी बाब ही आहे की, तो आंघोळ करायलाच आला होता का?
 

Web Title: Burglar breaks into home at night and takes shower owner caught him wrapped in a towel