शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडकी बहीण’चा फटका; ‘आनंदाचा शिधा’ विसरा
2
कफ सिरप मृत्यू प्रकरणात मध्य प्रदेशात डॉक्टरची अटक; IMA आक्रमक, थेट सरकारलाच दिला इशारा!
3
९.१ कोटी नोकऱ्यांची मोठी संधी, तीन नोकऱ्यांपैकी एक नोकरी या क्षेत्रातून येणार...
4
गाढ झोपेतच काळाने घातला घाला! ४ वर्षीय चिमुकलीसह मावशीचा सर्पदंशाने मृत्यू; डॉक्टर निलंबित
5
वर्गात मित्राला कसे मारायचे? ChatGPT वर एक प्रश्न विचारला; विद्यार्थ्याला तुरुंगात जावे लागले
6
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
7
संपादकीय: ...आता थेट मुकाबला ! आनंदाचा शिधा देणार नसले, तरी... 
8
दिवाळीत मोठ्या खरेदीसाठीसाठी 'क्रेडिट कार्ड'नं पैसे देणं योग्य आहे का?; 'या' गोष्टी लक्षात ठेवा
9
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!
10
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
11
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
12
वांगचूक यांना अटक; केंद्र सरकार, लडाखला नोटीस; तत्काळ सुटका करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी 
13
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
14
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
15
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 
16
ब्रुनको, रॅम्सडेल व साकागुची यांना मेडिसिनचे नोबेल; टी-पेशींचा शोध, कर्करोग आणि मधुमेहावर उपयुक्त
17
७ कोटींच्या घरांना ग्राहक मिळाले नाहीत, तर म्हाडा घरे भाड्याने देणार
18
परप्लेक्सिटीचा तांत्रिक बिघाड सोडवला, १ कोटीची नोकरी मिळाली; पालघर जिल्ह्यातल्या जितेंद्रची झाली निवड
19
लादेनच्या डोक्यात अमेरिकी नेव्ही सीलनेच गोळी झाडली होती, हे इतिहास विसरणार नाही : ट्रम्प
20
चंद्रभ्रमंती करून ‘स्पेस फ्लाइट’ने घरी परत याल, तेव्हा...

बहिणीच्या पडला प्रेमात, चार मुलांचा जन्म; रिलेशनशिपच्या गुन्ह्यात अनेकदा गेला तुरूंगात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 14:53 IST

Brother Married to Sister in Germany :  ४४ वर्षीय पॅट्रिकच्या बहिणीचं वय आता ३७ वर्षे आहे. दोघांना ४ मुलं आहेत. ज्यातील दोन दिव्यांग आहेत. पॅट्रिक म्हणाला की, त्याच्या परिवारात आधीही दिव्यांग मुलांचा जन्म झाला आहे.

Brother Married to Sister in Germany : जर्मनीमध्ये ४४ वर्षीय एका व्यक्ती बऱ्याच वर्षापासून एक कायदेशीर लढाई लढत आहे. त्याची मागणी आहे की, जवळच्या नातेवाईकांमध्ये लग्नाला गुन्हा समजणाऱ्या कायद्याला नष्ट केलं जावं. या कायद्यानुसार, तो अनेकदा तुरूंगातही गेला आहे. त्याचा गुन्हा हा आहे की, त्याने त्याच्या बहिणीसोबत लग्न केलं.

या व्यक्तीचं नाव आहे पॅट्रिक स्टूबिंग. तो जर्मनीच्या लीपजिगमध्ये राहणारा आहे. तो एका गरिब परिवारात जन्माला आला होता. त्यानंतर त्याला एका परिवाराने दत्तक घेतलं आणि त्याचं संगोपन त्याच्या भाऊ-बहिणींसोबत झालं नाही. मोठा झाल्यावर त्याने त्याच्या परिवाराचा शोध घेतला. यादरम्यान तो त्याची बहीण सुसन कॅरोलेवस्कीच्या प्रेमात पडला.

४४ वर्षीय पॅट्रिकच्या बहिणीचं वय आता ३७ वर्षे आहे. दोघांना ४ मुलं आहेत. ज्यातील दोन दिव्यांग आहेत. पॅट्रिक म्हणाला की, त्याच्या परिवारात आधीही दिव्यांग मुलांचा जन्म झाला आहे. त्याचे ६ भाऊ-बहिणींपैकी काही दिव्यांग होते. सर्वच भाऊ-बहिणींच निधन बालपणीच झालं होतं

पॅट्रिक म्हणाला की, बहिणीसोबत लग्न केल्याने त्याला गुन्हेगार ठरवण्यात आलं. तो म्हणाला की, त्याला गुन्हेगार ठरवून त्याच्या मानवाधिकाराचं हनन करण्यात आलं. पॅट्रिकचे वडील हिंसक होते. त्यांनी पॅट्रिकवर चाकूने वार केला होता. तेव्हा तो ३ वर्षांचा होता. यानंतर पॅट्रिकला कोर्टाच्या निरीक्षणात ठेवण्यात आलं आणि मग दत्तक देण्यात आलं. पॅट्रिकची आई चेन स्मोकर आणि बेरोजगार होती.

सुसन म्हणाली होती की, तिला घरातून प्रेम मिळालं नाही आणि ती तिच्या आईसाठी ओझं झाली होती. सुसनचं शिक्षण बरोबर झालं नव्हतं आणि ती मोठ्या मुश्कीलीने लिहू शकत होती.

आपल्या परिवाराला शोधल्यानंतर साधारण २२ वर्षांचा असताना पॅट्रिकची भे त्याची बहीण सुसनसोबत झाली. या भेटीनंतर काही दिवसातच त्याच्या आईचं निधन झालं. पॅट्रिक म्हणाला की, यानंतर बहिणीची जबाबदारी त्याच्यावर आली. वेगवेगळ्या मुलांच्या जन्मावर त्याच्यावर वेगवेगळ्या केसेस दाखल करण्यात आल्या. यात त्याने १० महिन्यांपासून ते अडीच वर्षांची शिक्षा भोगली. सुसनला शिक्षा झाली नाही कारण ती पर्सनॅलिटी डिसॉर्डरने ग्रस्त आहे. ती तिच्या निर्णयासाठी काही प्रमाणातच जबाबदार धरली जाऊ शकत होती.

२०१२ मध्ये कपलने याप्रकरणी फ्रान्स येथील European Court of human Rights (ECHR) मध्ये आवाज उठवला. फ्रान्स, तुर्की, जपान, ब्राझील मध्ये आधीच जवळच्या नातेवाईकांसोबत संबंधाला कायदेशीर मान्यता दिली आहे. यामुळे कपलने जर्मनीच्या कायद्यालाही बदलण्याची मागणी केली आहे. 

मात्र, ECHR ने सांगितलं की, जवळच्या नातेवाईकांमध्ये संबंधाला बॅन करण्याचा अधिकार जर्मनीला आहे. ते म्हणाले की, जर्मनीच्या कोर्टाने लग्न आणि परिवाराची सुरक्षा याबाबत पॅट्रिकला शिक्षा सुनावली. कोर्टाने सांगितलं की, जवळच्या नातेवाईकांमध्ये लग्न झाल्याने नुकसानाचा धोका जास्त असतो. सोबतच जवळच्या नातेवाईकांमध्ये संबंधाला बॅन करण्यात आलं कारण मुलं दिव्यांग जन्माला येण्याचा धोका असतो.

दरम्यान, २०१४ मध्ये German Ethics Council ने यू-टर्न घेतला आणि जवळच्या नातेवाईकांसोबत लग्न करण्याचा मंजूरी देण्याचा बाजूने मत दिलं. कपलच्या केसमध्ये विश्लेषण केल्यानंतर काउंसिलला आढळलं की, दिव्यांग होण्याचा धोका इतका जास्त नाही की, याला बेकायदेशीर ठरवता येईल. पण तरीही जर्मनीच्या कायद्यात बदल करण्यात आला नाही. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेGermanyजर्मनी