भाओजीसोबत मेहुणीला जबरदस्ती करावं लागलं लग्न, कारण वाचून व्हाल अवाक्....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 12:57 IST2023-03-27T12:57:00+5:302023-03-27T12:57:12+5:30

एका तरूणीचं तिच्या परिवाराकडून जबरदस्ती लग्न लावून देण्यात आलं होतं. पण तिने सासरी गेल्यावर असं काम केलं ज्यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही.

Brother in law had to marry under compulsion with bride's sister | भाओजीसोबत मेहुणीला जबरदस्ती करावं लागलं लग्न, कारण वाचून व्हाल अवाक्....

भाओजीसोबत मेहुणीला जबरदस्ती करावं लागलं लग्न, कारण वाचून व्हाल अवाक्....

Jija Saali Wedding : कधी कधी अशा स्थिती निर्माण होते की, काही लोकांना नातं जोडण्यासाठी सोबत यावं लागतं. सगळ्यांना माहीत आहे की, भाओजी आणि मेहुणीमध्ये थट्ट्याचं नातं असतं. पण बिहारच्या मधुबनीमधून एक अजब घटना समोर आली आहे. 

एका तरूणीचं तिच्या परिवाराकडून जबरदस्ती लग्न लावून देण्यात आलं होतं. पण तिने सासरी गेल्यावर असं काम केलं ज्यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. नवरी लग्नाच्या चार दिवसांनंतर घरातून पळून गेली. कारण तिचं दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम होतं.

लग्नानंतर माहेरच्या लोकांनी मुलीची पाठवणी केली. पण जेव्हा ती सासरी पोहोचली तिचं काही मन लागलं नाही आणि चार दिवसांनंतर ती तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. तरूणीचं लग्न 15 मार्चला झालं होतं. पण चार दिवसांनी ती पळून गेली. असं सांगितलं जात आहे की, लग्नाच्या दिवशी नवरीने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. अशात पंचायत बोलवण्यात आली मग तरूणीच्या बहिणीचं लग्न नवरदेवासोबत लावून देण्यात आलं. मेहुणीला नाईलाजाने भाओजीसोबत लग्न करावं लागलं.

पळून गेलेल्या तरूणीला तिच्या प्रियकरासोबत लग्न करायचं होतं. गावातील लोक या लग्नासाठी तयार झाले आणि समाजातील लोकांचीही सहमती मिळाली. असं सांगण्यात आलं की, दोघे अनेक वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होते. दोघांचंही लग्न सहमतीने एका मंदिरात लावून देण्यात आलं. 

Web Title: Brother in law had to marry under compulsion with bride's sister