एका भलत्याच हौसेसाठी स्पर्म डोमेट करत होता पती, लग्नाच्या २० वर्षांनंतर महिलेला समजलं आणि....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 11:24 IST2026-03-20T11:24:01+5:302026-03-20T11:24:42+5:30

Viral News : सामान्यपणे बरेच लोक सामाजिक कार्य म्हणून किंवा पैशांसाठी स्पर्म डोनेट करतात, पण या महिलेच्या पतीचं यासाठीचं कारण वेगळंच होतं. 

British women discovered his husband a secret sperm donor after 20 years of marriage | एका भलत्याच हौसेसाठी स्पर्म डोमेट करत होता पती, लग्नाच्या २० वर्षांनंतर महिलेला समजलं आणि....

एका भलत्याच हौसेसाठी स्पर्म डोमेट करत होता पती, लग्नाच्या २० वर्षांनंतर महिलेला समजलं आणि....

Viral News : जुळवून झालेलं लग्न असो वा प्रेमविवाह असो जोडप्याला लग्नानंतरच एकमेकांच्या छोट्या छोट्या चांगल्या - वाईट सवयी माहिती पडतात. जसजसे वर्ष पुढे जातात दोघेही एकमेकांना चांगले ओळखू लागतात. त्यांच्यात गुपित असं शक्यतो काही नसतं. पण ब्रिटनमधील महिलेला लग्नाच्या २० वर्षांनंतर पतीबाबत अशी गोष्टी समजली ज्याने तिला धक्काच बसला. महिलेचा पती गेल्या अनेक वर्षांपासून स्पर्म डोनेट करत होता, याद्वारे अनेक मुलांचा तो पिता झाला. पण ही बाब महिलेला सोशल मीडियावरून समजली. सामान्यपणे बरेच लोक सामाजिक कार्य म्हणून किंवा पैशांसाठी स्पर्म डोनेट करतात, पण या महिलेच्या पतीचं यासाठीचं कारण वेगळंच होतं. 

२० वर्षांनंतर पतीचं खरं रूप आलं समोर

महिलेला सोशल मीडियावर एका अनोळखी व्यक्तीचा मेसेज आला. या मेसेजमध्ये तिच्या पतीचा उल्लेख होता. आधी तर महिलेला हा खोडसाळपणा वाटला. पण जेव्हा महिलेने आणखी खोलात जाऊन माहिती मिळवली तेव्हा तिला धक्का बसला. महिलेला समजलं की, पती वेगळ्या नावाने सोशल मीडियावर सक्रिय होता. त्यावर त्याने स्पर्म डोनर अशी ओळख दिली होती. धक्कादायक बाब म्हणजे तो कोणत्याही मेडिकल सेंटर किंवा क्लीनिकसोबत जुळलेला नव्हता. तो स्वत: थेट स्पर्मची गरज असलेल्या महिलांच्या संपर्कात राहत होता.

स्पर्म डोनेट करण्याचं अजब कारण...

मीडिया रिपोर्टनुसार, महिलेचा पती दुसऱ्यांची मदत करण्यासाठी स्पर्म डोनेट करत नव्हता. त्याला असं करून मानसिक संतुष्टी मिळत होती. महिलेने सांगितलं की, ज्या महिलांना पती स्पर्म डोनेट करत होता, त्या गर्भवती महिलांच्या पूर्ण प्रोसेसमध्ये सोबत राहण्याचा प्रयत्न करत होता. त्याला गर्भवती महिला बघणं आणि त्या प्रोसेसमध्ये राहण्याचं मेंटल ऑब्सेशन होतं. याच एका कारणाने तो अनेक वर्षांपासून स्पर्म डोनेट करत होता.

जेव्हा महिलेने पतीचा पर्सनल डिव्हाइस चेक केला, तेव्हा समजलं की, पती स्पर्म डोनेशन केवळ एक - दोन वेळा नाही तर अनेकदा केलं. हा सगळा प्रकार बघून महिलेला मोठा धक्का बसला. पतीचा हा कारनामा समोर आल्यानंतर पत्नीने त्याच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्याशिवाय महिलेने इतर महिलांना सांगितलं की, अशाप्रकारच्या फ्री आणि अनधिकृत स्पर्म डोनेशनपासून स्वत:चा बचाव करा. 

Web Title : पति का गुप्त स्पर्म डोनेशन का जुनून 20 साल बाद उजागर।

Web Summary : ब्रिटिश महिला को 20 साल बाद पति की गुप्त स्पर्म डोनेशन की आदत का पता चला। वह पैसे या दान के लिए नहीं, बल्कि गर्भवती महिलाओं की मदद करने से मिलने वाली मानसिक संतुष्टि के लिए दान कर रहा था, जिसके कारण उनका अलगाव हो गया। पत्नी ने अनियमित स्पर्म डोनेशन के खिलाफ चेतावनी दी।

Web Title : Husband's secret sperm donation obsession revealed after 20 years of marriage.

Web Summary : A British woman discovered her husband's secret sperm donation habit after 20 years. He wasn't donating for money or charity, but for the mental satisfaction derived from helping pregnant women, leading to their separation. The wife warns against unregulated sperm donation.