Women Marries with Blanket: ऐकावं ते नवलंच! तरूणीने आवडत्या ब्लँकेटसोबत लग्न करून थाटला संसार, 'हे' आहे कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 16:13 IST2023-01-17T16:12:30+5:302023-01-17T16:13:18+5:30

आश्चर्याची बाब म्हणजे, या लग्नाला तिचा बॉयफ्रेंड कुटुंबासह हजर होता.

British Woman Marries Her Blanket, Describes Relationship With Her Duvet as The Most Meaningful One Watch Viral Video | Women Marries with Blanket: ऐकावं ते नवलंच! तरूणीने आवडत्या ब्लँकेटसोबत लग्न करून थाटला संसार, 'हे' आहे कारण...

Women Marries with Blanket: ऐकावं ते नवलंच! तरूणीने आवडत्या ब्लँकेटसोबत लग्न करून थाटला संसार, 'हे' आहे कारण...

British Woman Married With A Blanket: एका ब्रिटीश महिलेने तिचे कुटुंब, मित्र आणि बॉयफ्रेंड यांच्या साक्षीने थेट आपल्या ब्लँकेट विवाह केल्याची आश्चर्यकारक घटना घडली. याबद्दलचा खुलासा खुद्द तिनेच केला आहे. मुलीने सांगितले की हे पहिल्या नजरेतील प्रेम होते. पास्कल सेलिक (Pascale Sellick) असे या महिलेचे नाव आहे. तिच्या मते, हे त्याच्या 'आयुष्यातील सर्वोत्तम आणि अर्थपूर्ण नाते' आहे. ब्लँकेटने पहिल्या नजरेतच तिच्या मनाचा ठाव घेतला होता असे तिचे म्हणणे आहे. ब्लँकेट सोबतच्या तिच्या लग्नाचा व्हिडिओ पाहून नेटिझन्सलाही धक्काच बसला. पास्कल सेलिकने लपूनछपून नव्हे तर जाहीरपणे या विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. पहिल्या नजरेतच ती त्या ब्लँकेटच्या प्रेमात पडली आणि आता ती तिच्या ब्लँकेटला तिचा विश्वासू साथीदार मानते, असेही तिने सांगितले.

गर्लफ्रेंडने ब्लँकेटशी थाटामाटात केलं लग्न

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, तिने इंग्लंडमधील एक्सेटरमध्ये ब्लँकेटशी लग्न केले आणि तिच्या प्रियकर आणि त्याच्या कुटुंबाला आमंत्रित केले. एका टीव्ही शोमध्ये पास्कलने सांगितले की, अनेक ब्लँकेट असूनही, फक्त हीच ब्लँकेट तिला सर्वात जास्त आराम आणि उबदारपणा देते. पास्कलच्या मते, ब्लँकेट तिच्यासाठी मित्रासारखे आहे. सुख-दुःखात ते ब्लँकेट तिच्यासोबत असते. तिच्या प्रियकराबद्दल विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात पास्कलने उत्तर दिले की, मी ब्लँकेटशी लग्न का केले, हे त्याने नीट समजून घेतलं आहे.

लग्नात प्रियकर, त्याचे कुटुंबीयही होते आमंत्रित

"माझा बॉयफ्रेंड जॉनी मला समजून घेतो. त्याला माहिती आहे की एक खास संदेश देण्यासाठी मी ब्लँकेटशी लग्न केले आहे. माझा प्रियकर ही गोष्ट नीट समजून वागतो आहे. आमचे खरोखर प्रेमळ नाते आहे. तो माझ्या या कृत्यावर अजिबातच चिडत किंवा रागावत नाही, त्याला ब्लँकेटशी काहीच अडचण नाही. उलट मी जे केलं त्यामुळे त्याला माझा अभिमान आहे." व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांच्या लग्नाचे फोटोही खूप शेअर केले जात आहेत.

ब्लँकेटशी लग्न करणे हा पास्कलचा स्वत:वरील प्रेमावर भर देण्याचा मार्ग होता. लोकांना समजावे की प्रेम शोधण्यासाठी नातेसंबंधात असणे आवश्यक नाही. पास्कलने ब्लँकेटशी लग्न करून असाच संदेश दिला आहे, असे ती स्वत: सांगते. 

Web Title: British Woman Marries Her Blanket, Describes Relationship With Her Duvet as The Most Meaningful One Watch Viral Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.