दोन फेऱ्यानंतर नवरीने पाहिला नवरदेवाचा चेहरा, लग्न थांबवून म्हणाली - त्याचा रंग आवडला नाही...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2022 22:16 IST2022-07-08T11:25:46+5:302022-07-08T22:16:47+5:30
After Two Pheras Bride Calls Off wedding: रवि यादव नावाच्या नवरदेवासोबत नीता यादवचं लग्न होणार होतं. लग्नादरम्यान नवरी-नवरदेवाने एकमेकांच्या गळ्यात हार टाकले. त्यानंतर सप्तपदी सुरू झाली.

दोन फेऱ्यानंतर नवरीने पाहिला नवरदेवाचा चेहरा, लग्न थांबवून म्हणाली - त्याचा रंग आवडला नाही...
After Two Pheras Bride Calls Off wedding: लग्नातील एक अजब घटना समोर आली आहे. ज्यात एका नवरीने दोन फेऱ्यानंतर लग्न करण्यास नकार दिला. ही घटना उत्तर प्रदेशच्या इटावामधील आहे. इथे नवरीने ऐनवेळी लग्न करण्यास नकार दिला कारण नवरदेवाचा रंग जास्त डार्क होता. नवरीला नवरदेव आवडला नाही म्हणून तिने ऐनवेळी असा निर्णय घेतला आणि हे लग्न मोडलं.
रवि यादव नावाच्या नवरदेवासोबत नीता यादवचं लग्न होणार होतं. लग्नादरम्यान नवरी-नवरदेवाने एकमेकांच्या गळ्यात हार टाकले. त्यानंतर सप्तपदी सुरू झाली. यावेळी दोन फेऱ्यानंतर नवरी पुढे गेलीच नाही आणि तिने सांगितलं की, ती हे लग्न करणार नाही. तिने आरोप लावला की, तिने आधी नवरदेवाला पाहिलं नव्हतं. ती असंही म्हणाली की, नवरदेवाचा रंग तिला हवा तसा नाही. त्याचा रंग फार डार्क आहे. नवरी लगेच मंडपातून निघून गेली आणि कुटुंबियांनी समजावल्यावरही तिने काही ऐकलं नाही.
लग्नासाठी तिला कुटुंबिय 6 तास समजावत होते. त्यानंतर नवरदेव वरात घेऊन परत जाण्यासाठी तयार झाला. नवरदेवाच्या वडिलाने आता पोलिसात तक्रार दाखल केली आहे की, नवरीला दिलेले दागिने, गिफ्ट अजून त्यांनी परत दिले नाहीत. इतकंच नाही तर नवरदेव असंही म्हणाला की, या घटनेनंतर त्याच्या जीवाला धोका आहे. नवरदेव असंही म्हणाला की, तरूणी आणि तिचा परिवार मला भेटण्यासाठी अनेकदा आले. पण माहीत नाही तिने वेळेवर असं का केलं.