लग्नाआधी नवरीने सासऱ्याच्या मांडीवर बसण्याची अनोखी प्रथा, ७ ते ११ वेळा करावी लागते उठक-बैठक...पाहा कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 16:56 IST2026-03-19T16:56:20+5:302026-03-19T16:56:45+5:30
Nigerian Marriage Tradition : या प्रथेदरम्यान नवरीला आपले सासरे किंवा कधी कधी नवरेदवाच्या मांडीवर बसण्यासाठी सांगितलं जातं. ही प्रक्रिया एक-दोन वेळा नाही तर एक निश्चित संख्येत करायला लावली जाते.

लग्नाआधी नवरीने सासऱ्याच्या मांडीवर बसण्याची अनोखी प्रथा, ७ ते ११ वेळा करावी लागते उठक-बैठक...पाहा कारण...
Nigerian Marriage Tradition : जगभरात लग्नासंबंधी वेगवेगळे रितीरिवाज पार पाडले जातात. काही प्रथा तर इतक्या अनोख्या असतात की, सहज त्यांवर विश्वास बसत नाही. दोन तर अशा जमातींमधील एका वेगळ्याच प्रथेबाबत आपण आज पाहणार आहोत. या जमातींमध्ये नव्या जोडप्याचं लग्न संपन्न झालं हे ठरवण्यासाठी नवरीला सासऱ्याच्या किंवा नवरदेवाच्या मांडीवर ७ ते ११ वेळा बसावं लागतं. चला तर जाणून घेऊ नेमकी काय असते ही प्रथा आणि असं का केलं जातं.
नायजेरियाच्या दक्षिणी भागात राहणाऱ्या दोन जमाती एदो (Edo) आणि एसान (Esan) जमातींमध्ये ही परंपरा फार पूर्वीपासून पार पाडली जाते. इथे लग्न समारंभ तोपर्यंत पूर्ण मानला जात नाही जोपर्यंत नवरी ही अनोखी प्रथा पूर्ण करत नाही. या प्रथेदरम्यान नवरीला आपले सासरे किंवा कधी कधी नवरेदवाच्या मांडीवर बसण्यासाठी सांगितलं जातं. ही प्रक्रिया एक-दोन वेळा नाही तर एक निश्चित संख्येत करायला लावली जाते. सामान्यपणे ७ ते ११ वेळा ही प्रक्रिया केली जाते.
या प्रथेमागे लोकांची मान्यता अशी आहे की, ही प्रथा नवरीने आपलं घर सोडून सासरच्या परिवारात पूर्णपणे सामिल होण्याचं प्रतीक आहे. सासऱ्याच्या मांडीवर बसणं हे दर्शवतं की, आता ती त्या घरातील मुलगी झाली आहे आणि परिवारातील मोठ्यांनी तिचा मनापासून स्वीकार केला आहे. या प्रथेला एकप्रकारे बदलाची प्रथा मानली जाते. नायजेरियाच्या संस्कृतीमध्ये संख्येला फार महत्व असतं. नवरीने सासऱ्याच्या मांडीवर ७ ते ११ वेळा बसणं याचं प्रमाण असतं की, ती या लग्नासाठी मानसिक आणि शारीरिक रूपाने तयार आहे.
प्रत्येकवेळी मांडीवर बसताना काही खास प्रार्थना किंवा मंत्र उच्चारले जातात. स्थानिक लोकांचं मत आहे की, इतक्या वेळा ही प्रक्रिया रिपीट केल्याने लग्नाचं नातं अतूट राहतं आणि येणाऱ्या काळात पती-पत्नीमध्ये कोणतीही अडचण येत नाही. ही प्रथा साक्षीदार आणि लोकांसमोर सार्वजनिकपणे केली जाते. ही मांडीवर बसण्याची प्रथा पार पाडल्यानंतर नवरदेव नवरीला घट्ट मीठी मारतो. नवरदेवाची ही मीठी याचा संकेत असते की, त्याने त्याच्या पत्नीची जबाबदारी पूर्णपणे घेतली आहे. तसेच या क्षणापासून नवरीवर तिच्या पतीचा आणि सासरच्या लोकांचा अधिकार आणि तिच्या सुरक्षेची जबाबदारी आहे.
यानंतर लग्न संपन्न झाल्याची घोषणा केली जाते. आजच्या आधुनिक जगातही एदो आणि एसान समुदायातील लोक आपली ही परंपरा जपून आहेत. बाहेरच्या जगासाठी ही प्रथा जरा अजब आहे. पण नायजेरियातील समाजात ही प्रथा सन्मानजनक आणि पवित्र मानली जाते. हा प्रथेद्वारे हे निश्चित होतं की, नवरीचं आपल्या सासऱ्यांसोबतचं नातं वडील आणि मुलीसारखं मजबूत आहे.