'तू काळा आहेस, माझ्या मैत्रिणी खिल्ली उडवतील..', नवरी लग्नाआधी नवरदेवाला म्हणाली आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 09:39 IST2022-12-08T09:38:26+5:302022-12-08T09:39:44+5:30
Uttar Pradesh : दिल्लीच्या निहाल विहारमध्ये राहणाऱ्या दुर्गा प्रसाद याने हुंडा न घेण्याच्या अटीवर कॅंट येथे राहणाऱ्या तरूणीसोबत लग्न ठरवलं होतं.

'तू काळा आहेस, माझ्या मैत्रिणी खिल्ली उडवतील..', नवरी लग्नाआधी नवरदेवाला म्हणाली आणि मग...
उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बरेलीमध्ये एका नवरीने लग्न करण्यास नकार दिला. ती तिच्या होणाऱ्या पतीला एकट्यात भेटली आणि म्हणाली की, 'ना तू सुंदर आहेस, ना जास्त शिकलेला, सोबतच तुझा रंगही काळा आहे. माझ्या मैत्रिणी माझी खिल्ली उडवतील. त्यामुळे मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही. बरं होईल जर तू लग्नास नकार दिला. नाही तर मी लग्नातून पळून जाईन. याने तुझी आणि तुझ्या परिवाराची बदनामी टळेल'.
हे ऐकून नवरदेवाला धक्का बसला आणि त्याने लगेच लग्नास नकार दिला. नवरदेवाने लग्नास नकार दिल्याने नवरीकडील लोक भडकले आणि वाद सुरू झाला. नवरीच्या घरातील लोकांनी मुलाकडील सगळ्या वस्तू हिसकावल्या आणि त्यांच्यासोबत गैरवर्तन केलं.
दिल्लीच्या निहाल विहारमध्ये राहणाऱ्या दुर्गा प्रसाद याने हुंडा न घेण्याच्या अटीवर कॅंट येथे राहणाऱ्या तरूणीसोबत लग्न ठरवलं होतं. सहा महिन्याआधी तो परिवारासोबत तरूणीच्या घरी टिळा लावण्यासाठी आला. यावेळी तरूणी तिच्या होणाऱ्या पतीला म्हणाली की, तो काळा आहे आणि कमी शिकलेला आहे. त्यामुळे ती लग्न करू शकत नाही. जर त्याने लग्नासाठी नकार दिला नाही तर ती घरातून पळून जाईल. असं झालं तर तुझी बदनामी होईल.
दुर्गा प्रसाद म्हणाला की, होणाऱ्या नवरीचं ऐकल्यानंतर त्याने लग्नास नकार दिला. यानंतर तरूणीच्या भाओजीने दुर्गा प्रसादच्या नातेवाईकांना फोनवर शिव्या दिल्या आणि तुरूंगात पाठवण्याची धमकी दिली. तो नंतर वाद मिटवण्यासाठी कुटुंबियांसोबत तरूणीच्या घरीही गेला. त्यासोबतच तरूणाने आरोप लावला की, नवरीचे कुटुंबिया त्यांना धर्मशाळा येथे घेऊन गेले आणि दोन लाखांची मागणी केली.
पैसे न दिल्याने त्यांना काठ्यांनी मारहाण करून बेशुद्ध केलं आणि त्यांच्या वस्तूही घेतल्या. नातेवाईकांसोबत गैरवर्तनही केलं. त्यानंतर हा वाद मिटवण्यासाठी पंचायत बोलवावी लागली. पोलिसांनी रिपोर्ट दाखल करून चौकशी सुरू केली आहे.