लग्नाच्या दिवशीच महिलेने मोडलं लग्न, कारण वाचून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2018 13:55 IST2018-06-19T13:55:21+5:302018-06-19T13:55:21+5:30

बरं या महिलेने केवळ लग्न तोडलं नाहीतर ती आपल्या मैत्रिणींसह हनीमूनला निघून गेली. 

Bride dumps fiance on wedding day after he failed to pay venue bill | लग्नाच्या दिवशीच महिलेने मोडलं लग्न, कारण वाचून व्हाल थक्क

लग्नाच्या दिवशीच महिलेने मोडलं लग्न, कारण वाचून व्हाल थक्क

इंग्लंड : कधी हुंडा मागितल्यामुळे तर कधी सन्मान न मिळाल्याने काही मुलींनी नवरदेव वरात घेऊन दारात आलेला असताना लग्न मोडल्याचं तुम्ही ऐकलं असले. असे प्रकार केवळ आपल्या देशातच नाहीतर परदेशातही घडतात. असाच एक प्रकार इंग्लंडमध्ये घडला आहे. पण यावेळी मुलीने लग्न मोडण्याचं कारण काही वेगळंच आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, इंग्लंडच्या डोरसेटमध्ये राहणारी दोन मुलांची आई असलेल्या हॅरिएट बटलरने लग्नाच्या दिवशीच आपलं लग्न मोडलं. कारण तिचा नवरदेव म्हणजेच केविन रोजर्स याने ज्या हॉटेलमध्ये लग्न होणार होतं व्हेन्यूचं बिलचं भरलं नव्हतं. 

(Image Credit: www.mirror.co.uk)

यावर महिला म्हणाली की, 'विषय केवळ पैशांचा नव्हता. पण हे माझ्या श्रीमुखात लगावल्यासारखंच होतं. मला त्याने हॉटेलच्या बिलाबाबत काहीही सांगितलं नव्हतं'.

हा सगळा प्रकार झाल्यावर महिलेने आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत पार्टी केली. लग्नासाठी तयार केलेले ड्रेस परिधान करुनच महिलेने पार्टी केली. ही पार्टी सुरु असताना नवरदेवाचे अनेक फोन येत होते. पण तिने फोन रिसीव्हच केला नाही. 

Web Title: Bride dumps fiance on wedding day after he failed to pay venue bill