दारू पिऊन मंडपात आला नवरदेव, रिती-रिवाज सुरू असताना जमिनीवर झोपला आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2023 16:41 IST2023-03-11T16:41:27+5:302023-03-11T16:41:48+5:30
असं कमीच बघण्यात आलं आहे की, नवरदेव लग्नात दारू पिऊन आला आणि सगळा गोंधळ झाला. अशीच एक घटना समोर आली आहे.

दारू पिऊन मंडपात आला नवरदेव, रिती-रिवाज सुरू असताना जमिनीवर झोपला आणि मग...
लग्नात अनेकदा अशा घटना घडतात ज्यांची कधीच अपेक्षा नसते. नवरीकडील लोक आनंदाने वरातीचं स्वागत करतात. हे स्वागत बघून मुलाकडील लोकही आनंदी होतात. पण अनेक मुलाकडील लोक दारू पिऊन येतात आणि वातावरण खराब करतात. असं कमीच बघण्यात आलं आहे की, नवरदेव लग्नात दारू पिऊन आला आणि सगळा गोंधळ झाला. अशीच एक घटना समोर आली आहे.
एका रिपोर्टनुसार, आसाममध्ये एक नवरदेव त्याच्या लग्नात इतकी दारू पिऊन आला की, तो तिथेच मंडपाजवळ झोपला. नवरदेव इतका पिला होता की, त्याला अजिबात शुद्ध नव्हती की, तो काय करतोय. खाली झोपलेल्या नवरदेवाचं कृत्य पाहिल्या पाहिल्या नवरीने त्याच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला. आसामच्या नलबाडी भागात वरात घेऊन आलेला नवरदेवा लग्नाचे रिवाज पूर्ण करू शकला नाही. नवरदेवाचं नाव प्रसेनजीत हालोई. पंडित लग्नाचे रिवाज पार पाडत होते तेव्हा तो खाली झोपला.
त्यानंतर मुलीने लग्न करण्यास नकार दिला आणि पोलिसात याबाबत तक्रार देण्यात आली. तसेच या लग्नासाठी करण्यात आलेला खर्चही परत मागितला. कुटुंबिय म्हणाले की, मुलाकडील अनेक लोक नशेत आले होते. तरीही आम्ही काही म्हणालो नाही. रिवाज सुरूच होते. पण नवरदेव कारमधून खालीही उतरू शकत नव्हता. तो खूप नशेत होता. जेव्हा मंडपात तो झोपला तेव्हा लग्न मोडावं लागलं.