Brazilian Woman fall in a ten feet deep hole and survived because of drinking rain water | १० फूट खोल खड्ड्यात पडली महिला, ८ दिवस केवळ पावसाच्या पाण्यावर राहिली जिवंत....

१० फूट खोल खड्ड्यात पडली महिला, ८ दिवस केवळ पावसाच्या पाण्यावर राहिली जिवंत....

ब्राझीलमध्ये एका वृद्ध महिलेने मोठ्या संघर्षानंतर मृत्यूवर विजय मिळवला आहे. डोना गेराल्डा नावाची ७६ वर्षीय महिला ब्राझीलच्या करवेलो शहरात राहते आणि ती एक दिवस अचानक एका १० फूट खड्ड्यात पडली होती. आठ दिवसांपर्यंत डोना याच खड्ड्यात अडकून राहिल्या. पण त्यांनी हिंमत सोडली नाही आणि अखेर त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं.

डोना गायब झाल्यानंतर त्यांच्या शेजाऱ्यांनी त्यांचा शोध घेणं सुरू केलं होतं. त्यांनी स्थानिक दुकाने, हॉस्पिटल्स आणि इतकंच काय तर स्मशानभूमीतही त्यांचा शोध घेतला. त्यांचा पत्ता काही लागला नाही. यानंतर स्थानिकांनी एकत्र येऊन एक सर्च पार्टी तयार केली आणि  लोक एकत्र येऊन त्यांना शोधू लागले. (हे पण वाचा : क्या बात! अर्ध्या रात्री जहाजातून समुद्रात पडली एक व्यक्ती, कचऱ्याने वाचवला त्याचा जीव!)

डोनाचे शेजारी रोसाना यांच्यानुसार, आम्ही वॉक करत असताना आमच्यासोबतचे काही लोक डोना यांचं नाव घेत होते. हाच आवाज ऐकून डोना यांनीही आम्हाला आवाज दिला. डोना यांना डायबिटीस आहे आणि त्यांना रोज इन्सुलिन शॉट्स लागतात. असात डोना यांची तब्येत गंभीर झाली होती.

या टीममधील एका व्यक्तीने सांगितले की, त्या ठीक बोलू शकत होत्या. पण त्यांना हे कळत नव्हतं की, अखेर त्या तिथे कशा पोहोचल्या. मी जेव्हा त्यांना विचारलं की, तु्म्ही जिवंत कशा राहिल्या. तर त्यांनी सांगितले की, केवळ पावसाचं पाणी पिऊन त्या जगल्या. माझ्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता. (हे पण वाचा : हिंमतीला सलाम! ७ वर्षांची मुलगी लिंबू पाणी विकून स्वत:च्या सर्जरीसाठी जमा करतेय पैसे!)

डोना यांना फायर फायटर्सनी सुरक्षितपणे बाहेर काढलं आणि त्यांना मेडिकल चेकअपसाठी स्थानिक हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. डॉक्टर या गोष्टीने हैराण होते की, डोना यांना ना फ्रॅक्चर होतं ना जखम झाली होती. तसेच त्या शॉकमध्येही नव्हत्या. पण डोना सारख्या वृद्ध महिलेने ८ दिवस केवळ पावसाच्या पाण्यावर जीवन काढणं मोठी गोष्ट आहे. 
 

Web Title: Brazilian Woman fall in a ten feet deep hole and survived because of drinking rain water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.