कोव्हिड मास्क निर्बंध उठवल्याचा 'या' माणसाला झाला इतका आनंद की कापला शरीराचा 'हा' पार्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 14:57 IST2022-04-18T14:48:50+5:302022-04-18T14:57:23+5:30
ब्राझीलमध्येही जेव्हा मास्क घालण्याची सक्ती रद्द करण्यात आली तेव्हा एका व्यक्तीला इतका आनंद झाला की त्याने स्वतःचे दोन्ही कान कापले.

कोव्हिड मास्क निर्बंध उठवल्याचा 'या' माणसाला झाला इतका आनंद की कापला शरीराचा 'हा' पार्ट
गेल्या 2 वर्षांपासून संपूर्ण जग कोरोना महामारीशी (Coronavirus) झुंज देत आहे. साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक मार्गदर्शक तत्त्वेही जारी करण्यात आली. यामध्ये सोशल डिस्टन्सिंग (Social Distancing), मास्क (Mask) वापरणे यांचा समावेश आहे. असे बरेच लोक आहेत ज्यांना मास्क घालण्याचा त्रास होतो. मात्र आता कोरोनाचा प्रसार अनेक ठिकाणी कमी झाल्याचं दिसत आहे, त्यामुळे अनेक देशांमध्ये मास्क घालण्याची सक्ती आता रद्द करण्यात आली आहे. ब्राझीलमध्येही जेव्हा मास्क घालण्याची सक्ती रद्द करण्यात आली तेव्हा एका व्यक्तीला इतका आनंद झाला की त्याने स्वतःचे दोन्ही कान कापले.
'WION' मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, मिशेल फारो डो प्राडो असं या व्यक्तीचं नाव असून तो 'HUMAN SATAN' या नावाने प्रसिद्ध आहे. त्याने आपल्या शरीरावर डझनभर टॅटू गोंदवलेले आहेत. इतकंच नाही तर अनेक ठिकाणी त्याने पियर्सिंगही करून घेतली आहे. त्याने आपले दातही विचित्र पद्धतीने कस्टमाइज केले आहेत. यानंतर त्याचं शरीर इतकं भयानक झालं आहे की त्याला पाहून लोक घाबरतात.
तो आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. आता त्याने नुकतंच आपला नवा फोटो पोस्ट केला असून हा फोटो पाहून लोक थक्क झाले. यामध्ये त्याने आपल्या शरीराचं नवीन रूप दाखवलं, ज्यामध्ये त्याला कान नव्हते. फोटो शेअर केल्यानंतर यूजर्सनी कमेंट करायला सुरुवात केली. लोकांनी म्हटलं की यावेळी तुला ख्रिसमसला एअरपॉड्स किंवा इअरबड्स मिळणार नाहीत.
प्राडोने सैतानसारखं दिसण्यासाठी शरीरात बरेच बदल केले आहेत. त्याने आपल्या शरीराच्या 80 टक्के भागावर टॅटू गोंदवले आहेत. यासोबतच त्याने आपल्या नाकाचा आकारही कमी केला आहे. आपल्या हाताला पंजाचा आकार देण्यासाठी त्याने करंगळीही काढून टाकली आहे. यासोबतच त्याने डोक्यावर शिंगेही लावली आहेत.