बोंबला! हनीमूनबाबत बॉयफ्रेन्डने व्यक्त केली 'अजब' इच्छा, ऐकून होणाऱ्या बायकोच्या पायाखालची सरकली जमीन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 13:18 IST2021-12-21T13:16:17+5:302021-12-21T13:18:20+5:30
Weird Honeymoon Plan : ब्रिटनमधील एका कपलचा हनीमून प्लान सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. पुरूषाने रिलेशनशिप पोर्टलवर हनीमून प्लानबाबत सांगितलं, ज्यानंतर यूजर्स त्याला शिव्या घालत आहेत.

बोंबला! हनीमूनबाबत बॉयफ्रेन्डने व्यक्त केली 'अजब' इच्छा, ऐकून होणाऱ्या बायकोच्या पायाखालची सरकली जमीन
हनीमून कोणत्याही विवाहित कपलसाठी खास संधी असतो. या खास क्षणांमध्ये दोन लोक एकमेकांच्या जवळ येतात आणि आपल्या लाइफ पार्टनरसोबत नवनवीन आठवणी तयार करतात. अशात ब्रिटनमधील एका कपलचा हनीमून प्लान (Honeymoon Plan) सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. पुरूषाने रिलेशनशिप पोर्टलवर हनीमून प्लानबाबत सांगितलं, ज्यानंतर यूजर्स त्याला शिव्या घालत आहेत.
पुरूषाने लिहिलं की, 'मला माझ्या हनीमूनवर माझ्या काही मित्रांना सोबत घेऊन जायचे आहे. मी काही चूक करतोय का?'. त्याने लिहिलं की, '७ महिन्यात माझं लग्न होणार आहे. मी आणि माझी होणारी बायको ज्या ठिकाणी हनीमूनला जात आहोत, ते ठिकाणी नेहमीच माझ्या मित्रांचं ड्रिम डेस्टिनेशन होतं. जेव्हा मी त्यांना हे सांगितलं तेव्हा ते म्हणाले की, त्यांनाही यायचं आहे'.
'मी त्यांना म्हणालो की, मी असा हनीमून प्लान करू शकतो, ज्या मी माझ्या सर्व मित्रांना नेऊ शकतो. माझ्या मित्रांना माझी ही आयडिया खूप आवडली. आम्हा सर्वांना हे ठिकाण फार आवडतं. पण दुर्दैवाने आम्ही एकत्र त्या ठिकाणी जाण्याचा कधी प्लान करू शकलो नाही. पण यावेळी हा प्लान सहजपणे बनत आहे. त्यामुळे मला वाटलं की, मित्रांनाही सोबत नेण्याची ही चांगली संधी आहे'.
या पुरूषाने त्याच्या या प्लानबाबत त्याच्या होणाऱ्या बायकोला सांगितलं तर ती त्याच्यावर ओरडली. त्याने लिहिलं की, 'माझी आयडिया ऐकताच माझी होणारी बायको माझ्यावर वेड्यासारखी ओरडू लागली होती. ती म्हणाली की, मला तिच्याशिवाय सर्वांची काळजी आहे. मी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला की हा प्लान आधीपासून नव्हता. अचानक वेळेवर बनला. मी फक्त इतकाच विचार केला की, माझ्या मित्रांना फिरण्याची संधी मिळेल. इतकंच काय तर मी तिलाही हे म्हणालो की, ती तिच्याही मित्र-मैत्रिणींना आणू शकते'.
'माझी होणारी बायको म्हणाली की, असा मूर्खपणाचा विचार तू करूही कसा शकतो? माझी इतकी चांगली आयडिया तिला भयानक वाटली. तिने माझ्यावर आरोप लावला की, मला तिची अजिबात काळजी नाहीये. ती म्हणाली की, हनीमूनला फक्त आपण दोघेच गेलो पाहिजे. आणि फ्रेन्डशिप ट्रिप बनवली. ती मला शिव्या देत म्हणाली की, मी तिला न विचारता मित्रांसोबत याबाबत चर्चा तरी कशी केली. मला तिचं हे पटलं. मी आधी तिला विचारायला हवं होतं. पण मला नव्हतं माहीत की तिला माझ्या आयडियाचं इतकं वाईट वाटेल. मला वाटलं ती याकडे गंमत म्हणून बघेल'.
लोक या पोस्टवरून पुरूषाला खूप काही ऐकवत आहेत. एकाने लिहिलं की, 'हा तुझा हनीमून आहे मूर्खा. तुझ्यासोबत लग्न करून तिचं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे'. एका दुसऱ्या यूजरने लिहिलं की, 'या पॉइंटवर तुझ्या होणाऱ्या बायकोने तुझ्यासोबत लग्नाच्या विचाराबाबत पुन्हा विचार करायला हवा'.