मुलींचे कपडे मागवायचा बॉयफ्रेंड, कारण समजताच गर्लफ्रेंडला बसला धक्का...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 20:22 IST2021-10-04T20:12:44+5:302021-10-04T20:22:07+5:30
एका तरुणीचा बॉयफ्रेंड सतत ऑनलाईन मुलींचे कपडे मागावायचा. ते कपडे मात्र तो तिला गिफ्ट करायचा नाही. ज्यावेळी यामागचं कारण तिच्या लक्षात आलं तेव्हा तिला धक्काच बसला.

मुलींचे कपडे मागवायचा बॉयफ्रेंड, कारण समजताच गर्लफ्रेंडला बसला धक्का...
गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडमधील चिटिंगचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील वाचले असतील पण हा किस्सा वाचून तुम्ही चक्रावून जाल. एका तरुणीचा बॉयफ्रेंड सतत ऑनलाईन मुलींचे कपडे मागावायचा. ते कपडे मात्र तो तिला गिफ्ट करायचा नाही. ज्यावेळी यामागचं कारण तिच्या लक्षात आलं तेव्हा तिला धक्काच बसला.
सोशल मिडिया वेबसाईट रेडिटवर हा किस्सा त्या तरुणीनंच शेअर केला आहे. यामध्ये तरुणीनं असं म्हटलंय की तिचा बॉयफ्रेंड सतत मुलींचे कपडे मागवायचा. याबबात विचारणा केली असता बोलणं टाळायचा. ते कपडे तो तिलाही गिफ्ट करत नव्हता. असं अनेक दिवस सुरु होतं. त्यानंतर एकदा तिने त्याचे मेल्स चेक केले. त्यामध्ये तिला एक मेल आढळला जो तो कपडे मागवत असलेल्या क्लोदिंग ब्रँडचा होता. त्यानंतर मला वाटले की माझा बॉयफ्रेंड माझ्यासोबत चिटिंग करत आहे. मला सजमत नव्हतं हा हे कपडे कोणासाठी मागवत होता. कारण कपडे डायरेक्ट पाठवले जात होते.
शेवटी ती त्या ब्रँडच्या दुकानात गेली आणि तिने या बद्दल त्या ब्रँडच्या स्टोर मॅनेजरला विचारणा केली. त्या स्टोर मॅनेजरने प्रायव्हसीचे कारण देत माहिती देण्यास नकार दिला. त्याने फक्त तिला ज्या पत्त्यावर ते कपडे पाठवले जात होते त्या घराच्या मालकिणीचे पहिले नाव सांगितले. ते ऐकुन तिला धक्काच बसला कारण ती मालकीण तिचीच बेस्ट फ्रेंड होती.
तिच्या या पोस्टवर लोक तिला सहानभूती देत आहेत. अनेकांनी तिच्या या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. त्यापैकी एकानं म्हटलंय ती तिची खरंच बेस्ट फ्रेंड असती तर तिने असं केलं नसतं.