ज्या सापाने दंश केला त्याला घेऊन तरूण हॉस्पिटलमध्ये गेला, बघून डॉक्टरही झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 10:46 IST2023-12-20T10:44:43+5:302023-12-20T10:46:15+5:30

हॉस्पिटलमध्ये त्याने डॉक्टरांना सांगितलं की, याच सापाने त्याला दंश मारला. साप बघून डॉक्टरही हैराण झाले. त्यांनी लगेच तरूणावर उपचार सुरू केले.

Boy reached hospital with cobra snake that bit him doctors surprised in Banda | ज्या सापाने दंश केला त्याला घेऊन तरूण हॉस्पिटलमध्ये गेला, बघून डॉक्टरही झाले हैराण

ज्या सापाने दंश केला त्याला घेऊन तरूण हॉस्पिटलमध्ये गेला, बघून डॉक्टरही झाले हैराण

उत्तर प्रदेशच्या बांदामधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एका कोब्रा सापाने एका तरूणाला दंश मारला होता. ज्यानंतर तरूणाने त्या सापाला पकडलं आणि थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचला. हॉस्पिटलमध्ये त्याने डॉक्टरांना सांगितलं की, याच सापाने त्याला दंश मारला. साप बघून डॉक्टरही हैराण झाले. त्यांनी लगेच तरूणावर उपचार सुरू केले.

आलमखोर गावातील ही घटना आहे. इथे राहणारा तरूण योगेंद्र मंगळवारी दुपारी शेतात पाणी देण्यासाठी गेला होता. तेव्हा अचानक एका विषारी सापाने त्याला दंश केला. ज्यामुळे त्याची तब्येत बिघडली होती. तरीही योगेंद्रने सापाला पकडलं आणि डब्यात भरून हॉस्पिटलमध्ये पोहोचला.

हॉस्पिटलमध्ये डब्यातील विषारी साप बघून सगळेच हैराण झाले होते. डॉक्टरही हैराण झाले होते. डॉक्टरांनी लगेच तरूणावर उपचार सुरू केले. डॉक्टर म्हणाले की, लवकरच तरूणाची तब्येत बरी होईल.

सापाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेल्या या घटनेची सध्या परिसरात चर्चा रंगली आहे. येथील डॉक्टरांनी सांगितलं की, गावातील एका तरूणाला हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं होतं. त्याला एका विषारी सापाने दंश केला होता. तरूणावर उपचार सुरू आहेत. 

Web Title: Boy reached hospital with cobra snake that bit him doctors surprised in Banda