शाब्बास रणरागिणी! महिला अधिकाऱ्यावर बिबट्याचा हल्ला, पायातून रक्त वाहू लागले तरीही...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 04:02 PM2020-06-02T16:02:08+5:302020-06-02T16:02:55+5:30

गावात पोहचल्यानंतर त्या घटनास्थळाची पाहणी करत होते. बिबट्याला पकडण्यासाठी योजना आखत असतानाच अचानक प्रियंका पाटील यांच्यावर झाडावरून बिबट्याने उडी मारुन हल्ला केला.

Blood flowing through the feet, still did not dare; forest officers caught such a leopard pnm | शाब्बास रणरागिणी! महिला अधिकाऱ्यावर बिबट्याचा हल्ला, पायातून रक्त वाहू लागले तरीही...

शाब्बास रणरागिणी! महिला अधिकाऱ्यावर बिबट्याचा हल्ला, पायातून रक्त वाहू लागले तरीही...

Next

रत्नागिरी – एक महिला अधिकारी किती धाडसाने आणि शूरपणे वनविभागात काम करु शकते याचं उत्तम उदाहरण रत्नागिरी येथे पाहायला मिळालं. याठिकाणी तैनात असणाऱ्या आरएफओ प्रियंका लगड यांचे कौतुक सोशल मीडियावर होत आहे. रत्नागिरीच्या बावनदी गावातील एका वाडीत बिबट्याने महिलेवर हल्ला केला त्याची माहिती मिळताच तात्काळ प्रियंका लगड, रेंज फॉरेस्ट अधिकारी राजेंद्र पाटील त्यांच्या टीमसह गावात पोहचले.

गावात पोहचल्यानंतर त्या घटनास्थळाची पाहणी करत होते. बिबट्याला पकडण्यासाठी योजना आखत असतानाच अचानक प्रियंका पाटील यांच्यावर झाडावरून बिबट्याने उडी मारुन हल्ला केला. बिबट्याने प्रियंका यांच्या मांडीला पकडलेलं असताना आजूबाजूच्या लोकांनी हटकताच त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यानतंर राजेंद्र पाटील यांच्या अंगावर बिबट्याने झेप घेताच त्यांनी प्रसंगावधान राहत बिबट्याचे तोंड दाबून धरले. जखमी अवस्थेत असतानाही प्रियंका मागे हटल्या नाहीत. पायातून रक्त वाहत असताना बिबट्याला पकडण्यासाठी पुढे सरसावल्या. त्यानंतर फॉरेस्ट गार्ड कडुकर यांच्या मदतीने बिबट्याने पकडण्यासाठी पुढे गेल्या. राजेंद्र पाटील यांनी बिबट्याचे तोंड दाबून ठेवल्याने तो कमजोर पडला, त्यानंतर काही गावकऱ्यांच्या मदतीने बिबट्याला पिंजऱ्यात बंद करण्यात यश आले.

याबाबत प्रियंका लगड यांनी सांगितले की, जेव्हा माझ्यावर हल्ला झाला त्यावेळी कोणतीही भीती माझ्या मनात नव्हती. बिबट्या माझ्यासमोर होता, त्याला पकडण्याचा प्रयत्न करणारे दोन सहकारी माझ्यासोबत होते, रक्त येत होतं पण बिबट्याला पकडणं महत्त्वाचं होतं. हा संपूर्ण प्रसंग काही क्षणातच घडला. त्यावेळी बिबट्याला पकडणे हाच विचार माझ्या मनात सुरु होता असं त्यांनी सांगितले.

दुर्दैवाने बिबट्याचा मृत्यू

आम्ही बिबट्याला पकडलं, त्याला पिंजऱ्यातून वनविभाग कार्यालयाकडे नेताना रस्त्यात त्याचा मृत्यू झाला. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये बिबट्याला कार्डियक अरेस्ट आल्याचं आढळलं, अचानक पॅनिक स्थिती झाल्याने बिबट्या घाबरला, आम्ही त्याला वाचवू शकलो नाही, ही खंत कायम राहील. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेले सध्या स्थिर आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

हुंड्यामध्ये बाईक न मिळाल्याने संतप्त पतीने पत्नीचा फोटो फेसबुकवर पोस्ट केला अन्...

लडाख सीमेजवळ चीनच्या लढाऊ विमानांचं उड्डाण; J-7 अन् J-17 भारतासाठी किती धोकादायक?

आत्मनिर्भर भारतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘५ आय’ हा नवा फॉर्म्युला; काय म्हणाले मोदी?

येत्या २४ तासांत मुंबई, रायगडवर ‘निसर्ग’ चक्रीवादळाचं तीव्र संकट; रेड अलर्ट जारी

कोरोनावर ‘हे’ औषध अत्यंत प्रभावी असल्याचं सिद्ध; अनेक रुग्ण बरे झाल्याचं चित्र!

Web Title: Blood flowing through the feet, still did not dare; forest officers caught such a leopard pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.