दोस्त दोस्त ना रहा...! जिवलग मित्राची पत्नी आणि मुलाला घेऊन मित्र फरार....

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 16:44 IST2020-06-22T16:43:46+5:302020-06-22T16:44:05+5:30

पत्नी आणि मुलगा सुखरूप घरी परत यावे म्हणून पीडित व्यक्ती पोलीस स्टेशनला फेऱ्या मारत आहे. तर पोलिसांनी तिघांचा शोध सुरू केलाय.

Bihar : Young man ran away with friend wife and son case registered | दोस्त दोस्त ना रहा...! जिवलग मित्राची पत्नी आणि मुलाला घेऊन मित्र फरार....

दोस्त दोस्त ना रहा...! जिवलग मित्राची पत्नी आणि मुलाला घेऊन मित्र फरार....

जिवलग मित्राने पाठीत खंजीर खुपसल्याची धक्कादायक घटना बिहारमध्ये घडली आहे. ज्या मित्रांवर इतका विश्वास होता त्या मित्राने दुसऱ्या मित्राचा संसार उध्वस्त केल्याचं समोर येतंय. फुलवारी शरीफ परिसरातील एक तरूण त्याच्या मित्राच्या पत्नीला आणि मुलाला घेऊन फरार झालाय. आता जिवलग मित्रानेच असा दगा दिल्याने पीडित व्यक्ती दु:खी आहे. पत्नी आणि मुलगा सुखरूप घरी परत यावे म्हणून पीडित व्यक्ती पोलीस स्टेशनला फेऱ्या मारत आहे. तर पोलिसांनी तिघांचा शोध सुरू केलाय.

जानीपूर पोलीस स्टेशन परिसरातील ही घटना आहे. या गावातील सूरजची नीरज नावाच्या तरूणासोबत चांगली मैत्री होती. दोघांची मैत्री इतकी चांगली होती की, सूरज हा कधीही पीडित नीरजच्या घरी जात-येत होता. असेही सांगितले जात आहे की, यादरम्यान सूरज नीरजच्या पत्नीच्या प्रेमात पडला. याची नीरजला कानोकान खबर लागू दिली नाही. गावातील लोकांनी सांगितले की, सूरज हा नीरजच्या पत्नीला माहेरी सोडण्यासाठी आणि परत आणण्यासाठीही जात होता. 

इतकेच नाही तर यामुळेच नीरजच्या सासरी सूरजची चांगली ओळखही झाली होती. ज्याचा फायदा सूरजने शुक्रवारी  घेतला. सूरज नीरजच्या सासरी गेला आणि त्याच्या सासूला खोटं सांगितलं की, नीरज आजारी पडलाय आणि त्याला पटण्याला एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. तो नीरजच्या पत्नीला आणि मुलाला घेण्यासाठी आलाय. सासूनेही दोघांना त्याच्यासोबत पाठवलं. तेव्हापासून तिघेही गायब आहेत. 

याची माहिती जेव्हा नीरजला मिळाली तेव्हा सगळीकडे त्यांचा शोध घेण्यात आला. पण काहीही सुगावा लागला नाही. अखेर नीरजने पोलिसात तक्रार दिली. पीडित तरूणाच्या काकांनी सांगितले की, पोलिसांनी योग्यप्रकारे तपास केला तर लगेच त्यांची माहिती मिळेल.

या घटनेबाबत पोलीस अधिकारी दीपक सम्राट यांनी सांगितले की, तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरू केला आहे. दोघांचेही मोबाईल बंद लागत आहेत. ज्यामुळे त्यांच्या लोकेशनची माहिती मिळवणं कठिण जातंय. सुरूवातीच्या तपासातून असं समोर येतं की, दोघांमध्ये आधीच प्रेम प्रसंग सुरू होता. पोलीस पुढील तपास करत आहेत.

बोंबला! बॉयफ्रेन्डला किस करणं गर्लफ्रेन्डला पडलं महागात, आता 'या' कारणाने मागतोय लाखो रूपयांची भरपाई!

कोल्ड ड्रिंकच्या बॉटलमध्ये कंडोम आणि जलजीऱ्याचं पाकीट, ग्राहकासह दुकानदारही हैराण....

Web Title: Bihar : Young man ran away with friend wife and son case registered