दोन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर प्रियकरासोबत लव्ह मॅरेज, 45 दिवसांनी एक्स बॉयफ्रेन्डसोबत फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 17:29 IST2022-06-22T17:29:45+5:302022-06-22T17:29:59+5:30
Bride ran away with ex boyfriend after marriage : मीडिया रिपोर्टनुसार, ही धक्कादायक घटना पटणाच्या नौबतपूरची आहे. इथे राहणारा 22 वर्षीय तरूण दोन वर्षाआधी एका 20 वर्षी तरूणीच्या प्रेमात पडला होता.

दोन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर प्रियकरासोबत लव्ह मॅरेज, 45 दिवसांनी एक्स बॉयफ्रेन्डसोबत फरार
बिहारमध्ये (Bihar) एका महिलेने लव्ह मॅरेजच्या 45 दिवसांनंतर असा काही कारनामा केला की, या घटनेची चर्चा सोशल मीडियावर होऊ लागली. तरूणीने आधी तिच्या पसंतीच्या तरूणासोबत लव्ह मॅरेज केलं आणि मग लग्नाच्या 45 दिवसांनंतर पैसे व दागिने घेऊन ती तिच्या एक्स बॉयफ्रेन्डसोबत फरार (Bride ran away with ex boyfriend after marriage ) झाली. आता लोकांना प्रश्न पडला आहे की, तिने हे कसं प्रेम केलं? चला जाणून घेऊ काय आहे घटना...
2 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते
मीडिया रिपोर्टनुसार, ही धक्कादायक घटना पटणाच्या नौबतपूरची आहे. इथे राहणारा 22 वर्षीय तरूण दोन वर्षाआधी एका 20 वर्षी तरूणीच्या प्रेमात पडला होता. दोघांचं एकमेकांवर इतकं प्रेम होतं की, या नात्यावर नाराज कुटुंबियांनाही त्यांनी मनवलं आणि सात फेरे घेऊन लग्नाच्या बंधनात अडकले. लग्न करून ते पती-पत्नी झाले. पण लग्नाच्या 45 दिवसांनंतर सोमवारी जेव्हा पती झोपलेला होता तेव्हा तरूणी घरातून पैसे आणि दागिने घेऊन तिच्या एक्स बॉयफ्रेन्डसोबत पळून गेली.
किती होती रक्कम आणि दागिने
तरूणाचं नाव सत्यानंद आणि तरूणीचं नाव रानी कुमारी आहे. दोघांनी 27 एप्रिल 2022 ला लव्ह मॅरेज केलं होतं. या घटनेमुळे धक्का बसलेल्या पतीने पत्नीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्याने पोलिसांना सांगितलं की, तिने तिजोरीचं लॉक तोडून 20 हजार रूपये रोख, मंगळसूत्र आणि इतर दागिनेही सोबत नेले. हे सगळं तिला लग्नात देण्यात आलं होतं. पोलीस सध्या चौकशी करत आहेत.
पतीलाही माहीत होतं तिचं आधीचं अफेअर
पतीने आरोप केला की, लग्नानंतर सुमन जेव्हा सासरी आली तेव्हा रात्ररात्रभर ती एका दुसऱ्या तरूणासोबत बोलत होती. जेव्हा त्याने याचा विरोध केला तेव्हा ती पतीचं काही ऐकायला तयार नव्हती. त्यानंतर काही दिवसांनी ती घरातून पैसे आणि दागिने घेऊन फरार झाली.