बाबो! ऑफिसमधील महिलेच्या प्रेमात पडला पती, तिच्याकडून दीड कोटी घेऊन पत्नीने दिला घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2021 12:41 IST2021-01-05T12:39:54+5:302021-01-05T12:41:54+5:30

फॅमिली कोर्टात काही दिवसांपूर्वी एक तक्रार आली होती. ज्यात एका अल्पवयीन मुलीने आरोप लावला होता की, तिच्या वडिलांचा ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका महिलेसोबत अफेअर सुरू आहे.

Bhopal : Wife divorces husband to allow him to marry his girlfriend for 15 crore rupees | बाबो! ऑफिसमधील महिलेच्या प्रेमात पडला पती, तिच्याकडून दीड कोटी घेऊन पत्नीने दिला घटस्फोट

बाबो! ऑफिसमधील महिलेच्या प्रेमात पडला पती, तिच्याकडून दीड कोटी घेऊन पत्नीने दिला घटस्फोट

एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सचे वेगवेगळे कारनामे नेहमीच समोर येत असतात. अशीच एक विचित्र घटना समोर आली आहे. मध्यप्रदेशची राजधानी भोपालमधून एक हैराण करणारा लव्ह ट्राएंगल समोर आला आहे. इथे एका महिलेने तिचा पती तिसऱ्याच महिलेला दीड कोटी रूपये घेऊन सोपवला. 

फॅमिली कोर्टात काही दिवसांपूर्वी एक तक्रार आली होती. ज्यात एका अल्पवयीन मुलीने आरोप लावला होता की, तिच्या वडिलांचा ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका महिलेसोबत अफेअर सुरू आहे. यामुळे घरात सतत भांडणं होत राहतात. याने घरातील वातावरण देखील खराब झालं. तक्रार करणाऱ्या मुलीच्या आणि तिच्या बहिणीच्या अभ्यासावरही याचा वाईट प्रभाव पडतो. सततच्या भांडणांमुळे अल्पवयीन मुलीने फॅमिलि कोर्टात तक्रार दाखल केली होती.

या मुलीच्या तक्रारीनंतर पती-पत्नीला काउन्सेलिंगसाठी बोलवण्यात आलं होतं. तेव्हा समोर आलं की, पतीचं ज्या महिलेसोबत अफेअर सुरू आहे ती त्याच्यापेक्षा वयाने मोठी आहे. आणि दोघेही एकाच ऑफिसमध्ये काम करतात. पती आणि त्याच्या प्रेयसीला एकत्र रहायचं आहे. पण हे पत्नीला मंजूर नाही.

अनेक टप्प्यांच्या काउन्सेलिंगनंतर अखेर यावर एक तोडगा काढण्यात आला. पत्नीने एका अटीवर पतीला सोडण्यास होकार दिला. प्रेयसीने आपला एक फ्लॅट आणि २७ लाख रूपये प्रियकराच्या पत्नीला दिले. तेव्हा तिला तिचं प्रेम मिळालं.

काउन्सेलरनुसार पत्नीचं मत होतं की, लग्नाच्या इतक्या वर्षांनंतरही पती आणि तिच्यात चांगले संबंध स्थापन होऊ शकले नाही त्यामुळे तिला त्याच्यासोबत रहायचं नव्हतं. त्यामुळे तिने हा निर्णय घेतला की, ती पुढचं आयुष्य तिच्या मुलींचं भविष्य सुधारण्यात घालवेल. 
 

Web Title: Bhopal : Wife divorces husband to allow him to marry his girlfriend for 15 crore rupees